तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ३ असेल तर तुमचा मूलांक ३ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ३ चा स्वामी ग्रह गुरु आहे. शनिवार ३ फेब्रुवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
गुंतवणूकीतून लाभ होईल, आर्थिक बाबतीत चांगला दिवस आहे. मॅनेजमेंटच्या बाबतीत अचुक असाल, कारण प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबात पाहुण्यांचे स्वागत होईल.
आर्थिक स्थिती स्थिर राहील. आरोग्य सुदृढ आहे, जर चांगल्या फिटनेसचा विचार करत असाल तर योगा क्लास लावून घ्या. जोडीदारासोबत चांगले क्षण घालवा. कुटुंबाच्या जवळ येण्याची संधी मिळेल.
घरात मंगलकार्य किंवा एखाद्याचा विवाह सोहळा पार पडेल. कार्यक्षेत्रात तुमची उपस्थिती दिसून येईल, तुमच्यासाठी दिवस चांगला आहे.
वेळ चांगली आहे. पगारवाढ होऊ शकते आणि तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. काही लोकांना धनसंपत्ती वारसाहक्कातून मिळू शकते.
आरोग्य तंदरुस्त ठेवण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण होईल. फिरायला जाण्याचे आयोजन करू शकतात. धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत.
आरोग्याच्या बाबतीत तंदरुस्त राहाल. घर किंवा मालमत्ता खरेदीसाठी दिवस चांगला आहे. अचानक खर्च उद्भवू शकतो.
कुटुंबाची साथ राहील, व्यावसायिक जीवनात भितीचे वातावरण निर्माण होऊ शकते, यामुळे सर्व बाबतीत नियंत्रण ठेवा. सुट्यांमध्ये प्रियव्यक्तीसोबत फिरायला जाणे आनंददायक ठरू शकते.
नवीन गाडीने लॉंग ड्रायवला जाण्याची संधी मिळेल. मालमत्ता संबंधी मतभेदामध्ये तुम्हाला भाऊ-बहिणीच्या विरोधात यावे लागेल. यावेळात काही लोकांना सुदृढ जीवनशैली निवडणे गरजेचे होऊन जाते.
मोठी रक्कम मिळण्याचे योग आहेत. आरोग्याची काळजी घेणारे लोकं स्वत:च्या निरोगी तब्येतीसाठी काही नवीन करतील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या