तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुयम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २९ असेल तर तुमचा मूलांक २+९=११, १+१=२ आहे. अंकशास्त्रात, मूलांक २ चा स्वामी ग्रह चंद्र आहे. शुक्रवार २९ मार्च २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
अचानक पैशाचे आगमन होऊ शकते. तुमचे आरोग्य बिघडू शकते, तुमच्या पचनसंस्थेत काही समस्या असू शकतात. पैसे गुंतवण्यापूर्वी नीट विचार करा. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस आनंददायी जाईल.
आज तुम्हाला पैशाची कमतरता जाणवणार नाही, तुमची मागील गुंतवणूक तुम्हाला दुप्पट परिणाम देत आहे. तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप आनंदी राहाल आणि धार्मिक कार्यात रस घ्याल. कुटुंबासोबत आजचा दिवस आनंदात जाईल.
आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, दिवसभर डोकेदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त राहू शकता. कौटुंबिक सदस्यासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे खूप मानसिक तणाव होऊ शकतो. कोणाशीही पैशाची देवाणघेवाण टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा.
व्यवसायात तुमचा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात परदेशात जाण्याचा विचार करू शकता, जे खूप फायदेशीर सिद्ध होईल. वैवाहीक जीवन सुखात व्यतीत होईल.
हुशारीने पैसे गुंतवा. नोकरदारांनी आज कामाच्या ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे, सहकाऱ्यांशी काही वाद होऊ शकतात. आज एखाद्या ग्राहक किंवा व्यावसायिक पक्षामुळे व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
तुम्हाला अचानक काही पैसे मिळतील. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला राहील, व्यवसायात आर्थिक लाभ होईल. तुमच्या बुद्धीने आणि सकारात्मक विचाराने सर्व कामे पूर्ण कराल. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस आनंददायी जाईल.
आज कोणाशीही पैशाची देवाणघेवाण टाळा अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. भावांसोबत काही मुद्द्यावर वैचारिक मतभेद होऊ शकतात.
आज तुमचे पैसे कुठेही गुंतवू नका. नोकरदार लोकांना आज अधिकाऱ्यांमुळे कामात अडचणी येऊ शकतात. व्यावसायिकांनी आज पैशाचे व्यवहार करताना सावध राहावे.
आज तुम्ही खूप उत्साही वाटाल. एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊन तुम्ही पैसे गुंतवलेत तर तुम्हाला मोठा नफा मिळेल. आंतरिकरित्या खूप आनंदी असाल. कुटुंबासोबत आजचा दिवस आनंदात जाईल.
संबंधित बातम्या