तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २८ असेल तर तुमचा मूलांक १ आहे. अंकशास्त्रात, मूलांक १ चा स्वामी ग्रह सूर्य आहे. रविवार २८ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
आर्थिक स्थिती चांगली राहील. धनलाभाचे नवीन मार्ग मिळतील. मागील गुंतवणूकीतून चांगला नफा मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नवीन संधी असतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा-परिक्षेत यश मिळेल. वैवाहीक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, परंतू जोडीदारासोबत थोडे वाद-विवाद पण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत मोठा निर्णय घेणे टाळा.
करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. कामकाजाचे चांगले परिणाम मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा येईल. सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी खूप शुभ काळ आहे. प्रेम जीवनात गैरसमजामुळे त्रास वाढू शकतो. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
दिवस फारच शुभ राहील. आर्थिक वृद्धी होईल. आर्थिक बाबतीत तज्ञांचा सल्ला घेतांना संकोच करू नका. कार्यक्षेत्रात लहान-मोठ्या अडचणींना सामोरे जा. कौटुंबिक जीवनात थोड्या अडचणी येतील. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जीवनशैलीत मोठे बदल घडतील.
समाजात मान-सन्मान मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक वृद्धी होईल. आधी केलेल्या गुंतवणूकीतून चांगला नफा मिळेल. सामुहीक पद्धतीने केलेल्या कामात यश लाभेल. व्यापाराचा विस्तार होईल. जोडीदारासोबत नाते घट्ट होईल. मन प्रसन्न राहील आणि घरात पाहुण्यांच्या येण्याने आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
मेहनतीने व लक्षपूर्वक केलेल्या कामात यश लाभेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्ही घेतलेले सर्व निर्णय बरोबर ठरतील. जोडीदाराचा पाठींबा मिळेल. कोणतेही कार्य अडचणी न येता पार पडतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. वैवाहिक जीवनात चढ-उताराची स्थिती राहील. कार्यक्षेत्रात व्यर्थ वाद-विवाद टाळा.
धार्मिक कार्यात वेळ द्याल. दैनंदीन गरजांवर विचारपूर्वक खर्च करावा. आरोग्यासंबंधी लहान-सहान तक्रारींच्या रीपोर्टवर लक्ष द्या. आर्थिक बाबतीत हुशारी ठेवा, कारण जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.
प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. कामाचे कौतूक होईल. महागातली वस्तू व दागदागीने कमी दरात खरेदी करू शकतात. विद्यार्थी अभ्यासात सुधारणा करतील तर चांगला परिणाम मिळेल. संपत्ती खरेदीसाठी बचतीचे नियोजन करू शकतात.
कोणताही निर्णय फार विचारपूर्वक घ्यावा. कामासंबंधी चिंता सोडून, मानसिक शांतीसाठी काहीतरी करणे हिताचे राहील. पाहुण्यांच्या येण्याने घरातील वातावरण गजबजून जाईल. दूरचा प्रवास करणाऱ्यांसाठी प्रवास सुखकर ठरेल. धनलाभाच्या नवीन स्त्रोत मिळतील.
करिअरमध्ये यश लाभेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तिच्या यशामुळे तुम्हाला फार आनंद होऊ शकतो. दूरचा प्रवास करण्यासाठी योग्य वेळ आहे. मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी ध्यान करावे. मालमत्ता संबंधी वाद सुरू असतील तर त्यात आज यश मिळण्याचे योग आहेत.