तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २७ असेल तर तुमचा मूलांक ९ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ९ चा स्वामी ग्रह मंगळ आहे. शनिवार २७ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
शारीरिक आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी त्यावर उपचार घ्याल. फॅशन डीजायनर आणि मेकअप आर्टिस्ट यांच्यासाठी आज व्यस्त दिवस आहे. घरातील महत्वाच्या कामासाठी वेळ काढण्यासाठी अडचण येईल.
ज्या लोकांसोबत तुम्हाला अवघडल्यासारखे होते त्यांच्यासोबत प्रवास टाळावा. मालमत्ता संबंधी बाबतीत स्वतचा वेळ घ्या, कारण ही वेळ थोडी नकारात्मक आहे. शैक्षणिक मेहनतीला लवकरच नावलौकीक मिळेल.
आर्थिक बाबतीत चांगला दिवस आहे. जास्तवेळ काम करणाऱ्यांना व्यस्ततेमुळे चांगला वेळ व्यतीत होईल. नवीन ठिकाणी बदली होत असेल तर, अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमचा मदत करण्याचा स्वभाव आज गरजूंसाठी व्यस्त राहील.
तुमचे मार्गदर्शन कुटुंबातील सदस्यांना स्वप्न साकारण्यासाठी मदतीचे ठरेल. काही लोकांसाठी नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरातून बाहेर जाण्याचे योग आहेत. खूप मेहनत व चांगले संपर्क तुम्हाला हव्या असलेल्या क्षेत्रात यश मिळवून देणारे ठरेल.
दैनंदीन व्यायामाने आरोग्य सुदृढ ठेवावे. कार्यक्षेत्रात काम वेळेवर पूर्ण करायचे असेल तर ते काम सर्वांना योग्य पद्धतीने वाटून द्यावे. संपत्ती विकणे लाभदायक ठरू शकते.
कुटुंबातील एखाद्या व्यक्तिच्या यशामुळे तुम्हाला फार आनंद होऊ शकतो. दूरचा प्रवास करण्यासाठी योग्य वेळ आहे. मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी ध्यान करावे. मालमत्ता संबंधी वाद सुरू असतील तर त्यात आज यश मिळण्याचे योग आहेत.
नशीबाची साथ लाभेल आणि धन लाभाचेही योग आहेत. कामासंबंधी चिंता सोडून, मानसिक शांतीसाठी काहीतरी करणे हिताचे राहील. पाहुण्यांच्या येण्याने घरातील वातावरण गजबजून जाईल. दूरचा प्रवास करणाऱ्यांसाठी प्रवास सुखकर ठरेल.
व्यायामातील नवीन प्रकार तुम्हाला तंदरूस्त ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल. महागातली वस्तू व दागदागीने कमी दरात खरेदी करू शकतात. विद्यार्थी अभ्यासात सुधारणा करतील तर चांगला परिणाम मिळेल. संपत्ती खरेदीसाठी बचतीचे नियोजन करू शकतात.
खाण्या-पिण्याची पथ्य पाळले नाही जाणार. दैनंदीन गरजांवर विचारपूर्वक खर्च करावा. आरोग्यासंबंधी लहान-सहान तक्रारींच्या रीपोर्टवर लक्ष द्या. आर्थिक बाबतीत हुशारी ठेवा, कारण जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)