मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार गणराज्य दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार गणराज्य दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 26, 2024 09:48 AM IST

Ank Bhavishya 26 january 2024: आज पौष शुक्ल प्रतिपदा तिथी असून, गणराज्य दिन आहे. अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

Numerology Horoscope 26 January 2024
Numerology Horoscope 26 January 2024

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २६ असेल तर तुमचा मूलांक ८ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ८ चा स्वामी ग्रह शनि आहे. शुक्रवार २६ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

आजचा दिवस चांगला आहे. धनलाभाचे योग आहेत. मागील देय रक्कम आज मिळून जाईल. परंतू काही गोष्टी बाकी आहे, ज्यामुळे तुमचे भविष्यातील नियोजन खराब होऊ शकते. तुमचे करिअर चांगले करण्यासाठी तुम्हाला काही संधी मिळू शकतात. बाहेरचे खाणे-पिणे टाळा.

मूलांक २- 

आवडत्या व्यक्तिसोबत रोमॅंटिक नात्याची सुरवात होऊ शकते. सिंगल असाल तर भावनेवर नियंत्रण ठेवा. मालमत्तेवर आकर्षक संधी मिळू शकते.

मूलांक ३- 

व्यावसायिक कामकाजासाठी बाहेर जावे लागू शकते. आरोग्य सुदृढ राहील. व्यावसायिक जीवनात तुमची प्रतिभा दिसेल, याचा पूर्ण लाभ घ्या. जोडीदाराला तुम्हाला काही सांगायचे आहे.

मूलांक ४- 

चांगला दिवस आहे, प्रेमजीवन चांगले आहे, जोडीदार जे काही सांगत आहे ते व्यवस्थित ऐकून घ्या. जेवायला बाहेर जाण्याचे नियोजन कराल. मालमत्तासंबंधी कामात एखाद्यामुळे अडथळे येतील.

मूलांक ५ - 

एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर चांगला परतावा मिळेल. शारीरिक मेहनत तुम्हाला सुदृढ ठेवण्यात उपयोगी ठरेल. सामाजीक संपर्क वाढू शकतात.

मूलांक ६- 

संपत्ती वाढवण्यासाठी तुम्ही जे नियोजन केले होते, ते यशस्वी होऊ शकते. व्यावसायिक जीवनात वर्तमानात एखादा प्रकल्प अडथळ्याशिवाय सुरू राहील. घरातील मंडळी तुमच्या विचारांना पाठींबा देतील.

मूलांक ७ - 

काही लोकांना जवळच्या व्यक्तिसोबत भेट घडू शकते. काही लोक कामासंबंधी बाहेरगावी जाऊ शकतात. आजचा दिवस सकारात्मक आहे जो काही लोकांसाठी खास राहील.

मूलांक ८- 

चांगली जीवनशैली राहील. यामुळे तुम्ही निरोगी व सुदृढ राहाल. बॅंक बॅलेन्समुळे आत्मविश्वास वाढेल. मालमत्ता मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जाल.

मूलांक ९- 

जवळच्या व्यक्तिकडून पैश्यांची भेट मिळू शकते जी तुम्ही नाकारू शकत नाही. व्यावसायिक स्तरावर तुम्हाला खूप काही मिळू शकते. कुटूंबातील सदस्य तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतो. संपत्ती संबंधी निर्णय काही दिवसांसाठी पुढे ढकला.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग