मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार आजचा धुळवडीचा सोमवारचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार आजचा धुळवडीचा सोमवारचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 25, 2024 03:16 PM IST

Ank Bhavishya 25 march 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा फाल्गुन पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

अंकभविष्य २५ मार्च २०२४
अंकभविष्य २५ मार्च २०२४

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुयम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २५ असेल तर तुमचा मूलांक २+५=७ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ७ चा स्वामी ग्रह राहू आहे. सोमवार २५ मार्च २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

तुम्हाला थकवा जाणवेल. होळीचा दिवस गोंधळाचा असेल. आपले काम करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहणे योग्य नाही. कुटुंबाकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही, परंतु होळीच्या निमित्ताने सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

मूलांक २- 

आज तुमचे मन रोमँटिक असेल. तुमच्या जोडीदारासोबत मोठ्या उत्साहाने होळी खेळाल. जर तुम्ही नवीन नात्याचा विचार करत असाल तर आज होळीच्या दिवशी तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. आज रागावर नियंत्रण ठेवा.

मूलांक ३- 

आज तुमच्या कामात कोणीतरी अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकेल. आपले मन इतरांसमोर लवकर उघडू नका. काही महत्त्वाची कामे पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. प्रॉपर्टीची कामे पूर्ण होऊ शकतात.

मूलांक ४- 

काही सकारात्मक सुधारणा घडवून आणणाऱ्या योजना पुढे येतील. आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी काही नवीन गोष्टी ऐकायला मिळतील. भविष्यात तुम्हाला या योजनांचा लाभ मिळू शकतो. आज मंदिरात सुके खोबरे अर्पण करावे.

मूलांक ५- 

कुटुंबात परस्पर समन्वय प्रस्थापित करण्याची संधी मिळेल. घरामध्ये काही पूजेची कामे होऊ शकतात. आज कोणीतरी तुमच्या कामात मदत करेल. यामुळे तुमचे काम सोपे होईल.

मूलांक ६- 

आज एखाद्याला तुमच्याकडून काही मदतीची आवश्यकता असू शकते, म्हणून मदत करण्यास तयार राहा. आज होळीच्या दिवशी कोणाशी तरी फिरण्याचा बेत आखला जाईल. आज लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक लाभ होईल.

मूलांक ७- 

थोडा आराम करण्याची संधी मिळू शकते. पुरेपूर आनंद घ्या आणि उत्साहाने होळी खेळा. या काळात तुम्ही प्रफुल्लित राहाल आणि तुमचे काम चांगले कराल. आज तुळशीला लाल धागा अर्पण करा.

मूलांक ८- 

आज तुम्ही काही महत्त्वाची कामे पूर्ण करणार आहात. धुळवडीच्या सणात रंगून जाल, आज तुम्हाला आराम करण्याची संधी मिळणार नाही. आज शिवाची स्तुती करा.

मूलांक ९- 

होळीच्या सणामध्ये आज तुम्हाला तुमचे निर्णय बौद्धिकपणे घ्यावे लागतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. मंदिरात तूपाचा दिवा अर्पण करा.

WhatsApp channel

विभाग