मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार पौष पौर्णिमेचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार पौष पौर्णिमेचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 25, 2024 10:46 AM IST

Ank Bhavishya 25 january 2024: आज पौष पौर्णिमा तिथी असून, गुरुपुष्य योगाचा संयोग होत आहे. अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

Numerology horoscope
Numerology horoscope

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २५ असेल तर तुमचा मूलांक ७ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ७ चा स्वामी ग्रह केतू आहे. गुरुवार २५ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

आजचा दिवस कामकाजाचा राहील. प्रेम जीवनात अनेक बदल घडतील त्यासाठी तयार राहा. कार्यक्षेत्रातील रोमॅंस विवाहीत व्यक्तींना अडचणीचा ठरेल. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो. शारीरिक व मानसिक आरोग्यावर लक्ष द्या.

मूलांक २- 

सामान्य दिवस राहील. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. आज गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. आई-वडीलांसोबत वेळ घालवणे चांगले राहील. एखादी गोड बातमी मिळेल.

मूलांक ३- 

मोठ्या बदलासाठी तयार राहा. करिअर संबंधी नवीन सौदा होईल. कामाचे कौतुक होईल. प्रेमाच्या बाबतीत वैवाहिक लोकांनी परस्पर चांगल्या क्षणांचा अनुभव घ्यायला हवा. आरोग्य सुदृढ ठेवा.

मूलांक ४- 

चढ-उताराचा दिवस राहील. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांसोबत वादापासून लांब राहा. रागावर नियंत्रण ठेवा.कोणतेही नवीन कार्य आज सुरू करू नका. कामात आणि दैनंदीन जीवनात संतुलन ठेवा. जास्त ताण घेऊ नका.

मूलांक ५ - 

आजचा दिवस चांगला राहील. धनलाभाचे योग तयार होत आहे. आर्थिक बाबतीत मदत करावी लागेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर एकमेकांना वेळ द्यायला हवा.

मूलांक ६- 

आजचा दिवस रोमॅंटीक राहील. सिंगल असाल तर आज आश्चर्याची भेट मिळेल. तुम्हाला आवडणारा व्यक्ती कदाचीत आज होकार कळवू शकतो. परस्पर नात्यात एकमेकांना पाठींबा द्यायला हवा.

मूलांक ७ - 

दिवस व्यस्त राहील. आर्थिक फायदा होईल पण खर्चही वाढतील. विनाकारणचा ताण-तणाव करून घेऊ नका. कामकाज सांभाळताना स्वत:साठी वेळ काढा. स्वत:च्या गरजांवर लक्ष द्या. आर्थिक बाबतीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा.

मूलांक ८- 

आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. जोखिम घेऊ नका, तशी गुंतवणूकही टाळा. व्यस्त दिवस राहील. वैवाहीक जीवनात अडचणींना सामोरे जावे लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

मूलांक ९- 

धनलाभ होऊ शकतो. एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल. तसेच, व्यवसाय करणाऱ्यांना नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला राहील. प्रेम जीवनात भूतकाळातील गोष्टींची आठवण काढली नाही तर चांगले होईल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग