मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार पौष शुक्ल चतुर्दशीचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार पौष शुक्ल चतुर्दशीचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 24, 2024 11:15 AM IST

Ank Bhavishya 24 january 2024: आज पौष शुक्ल चतुर्दशी तिथी असून, पौर्णिमा प्रारंभ होईल. अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

Numerology Horoscope
Numerology Horoscope

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २४ असेल तर तुमचा मूलांक ६ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ६ चा स्वामी ग्रह शुक्र आहे. बुधवार २४ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

चढ-उताराचा दिवस आहे. खर्च वाढू शकतो. गुंतवणूकीसाठी दिवस शुभ आहे. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्य चांगले ठेवा. प्रेम संबंधात दुरावा आला असल्यास आज हा दुरावा कमी होईल, गैरसमज दूर होतील.

मूलांक २- 

आजचा दिवस कामाचा राहील. व्यायवसायिक जबाबदारी व्यस्त ठेवेल. तुमच्या जोडीदाराच्या चांगल्या गुणांकडे लक्ष द्या. नोकरीसंबंधी मुलाखत देणार असाल तर आज यश मिळेल. बाहेरचे खाणे-पिणे टाळा.

मूलांक ३- 

सकारात्मकता वाटेल. मोठा आर्थिक व्यवहार त्रासदायक नाही ठरणार. सिंगल असाल तर तुमची एखाद्या आकर्षक व्यक्तिसोबत भेट घडू शकते. दिवसभर कामकाज करत असाल तर स्वत:साठी वेळ काढणे गरजेचे आहे.

मूलांक ४- 

तणावात्मक वेळ राहील. कामाचा व्याप वाढेल. चुका करणे टाळा. विनाकारणच्या वाद-विवादापासून लांब राहा. सकारात्मक विचार ठेवा. आर्थिक बाबतीत संतुलन राहील. जोडीदारासोबत वेळ घालवा.

मूलांक ५ - 

दिवस शुभ राहील. जोडीदारासोबत चांगल्या क्षणाचा अनुभव घ्या. आर्थिक गुणवत्ता वाढीचे योग आहेत. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. कामासंबंधी प्रवास घडू शकतो.

मूलांक ६- 

आजचा दिवस मौजमजेचा राहील. दुरावा निर्माण झालेल्यांना जोडीदाराकडून आश्चर्यकारक भेट मिळेल. कार्यक्षेत्रात राजकारणापासून लांब राहा. कुटूंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. व्यवसायात यश मिळेल. जास्तीत जास्त पाणी प्यावे.

मूलांक ७ - 

स्वत:वर प्रेम करा. बढतीचे योग आहेत. वेळेत काम संपवा. दिवस संपेल तसे आर्थिक अडचणी समोर उभ्या राहतील. सहकाऱ्यासोबत प्रेमाचं नातं निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मूलांक ८- 

जीवनात गोंधळ निर्माण होईल. स्थावर मालमत्ता आणि व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी दडपण येईल. आरोग्य चांगले राहील. सिंगल असाल तर आज एखाद्या व्यक्तिबद्दल आकर्षण वाढेल व तो तुम्हाला आवडू लागेल.

मूलांक ९- 

दिवस आनंदाचा राहील. स्वत:च्या व जोडीदाराच्या भावनात्मक गरजा समजून घेतल्या पाहिजे. आपल्या आर्थिक नियोजनावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा. पैसा हाती येईल पण खर्चही वाढतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ सांभाळा.

विभाग