तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २३ असेल तर तुमचा मूलांक ५ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ५ चा स्वामी ग्रह बुध आहे. मंगळवार २३ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
आरोग्याच्या तक्रारी राहतील, निरोगी व्हायला वेळ लागेल. आर्थिक चिंता सतावेल, कारण येणी कमी होऊन जाईल. काळजी घ्या.
तुमचे ध्येय गाठण्यासाठी काम करावं लागेल, यासाठी जास्तीत जास्त मेहनत घ्या. कुटूंबातील एखाद्या व्यक्तीसोबत व्यावसायिक पद्धतीने सौदा करावा लागेल.
मित्रांसोबत फिरताना दडपण आल्यासारखं वाटेल. या नकारात्मक गोष्टींना मनातून काढून टाका. याशीवाय मालमत्ता खरेदीसाठी दिवस चांगला आहे. आरोग्य तंदरूस्त ठेवण्यासाठी जर तुम्ही क्लास लावला असेल तर काहीही फरक पडणार नाही. तुम्हाला खाण्या-पिण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
वरिष्ठ तुम्हाला एका दमातच फार सल्ले देऊन देतील. त्यामुळे तुम्हाला कठीण वाटेल, पण हे तुमच्या फार कामी येईल. व्यस्त राहाल व घरातील कामाला वेळ मिळणार नाही.
जर देश-विदेशात शिकण्यासाठी व करिअरसाठी प्रयत्न करत असाल तर फार मेहनतीनंतर तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे मेहनत करत राहा.
आरोग्य चांगले राहील आणि आज सकारात्मक व ऊर्जात्मक असाल.जर तुमच्याजवळ पैसा असेल तर सोनं घेऊन त्यात हा पैसा गुंतवा, हे तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्ही एखादे नवीन काम सुरू करू इच्छित असाल तर करा, यातुन आर्थिक लाभ होईल.
घरात लहान-मोठे मंगलकार्य होऊ शकते. आज घर व वाहन खरेदीसाठी चांगला दिवस आहे, पण प्रयत्न करा की चांगला भावताव करून व कागदपत्रे व्यवस्थित तपासून खरेदी करा.
कर्ज घ्यायचे असेल तर आज कर्जप्रकरणाला मान्यता मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे सर्वजण कौतुक करतील.
ताण-तणावात्मक परिस्थितीवर मार्ग काढून, यश मिळवाल. थकवा जाणवत असेल तर लांबचा प्रवास करणे टाळावा.
संबंधित बातम्या