मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ank Shastra 22 May 2024 : बुधवारचा दिवस तुमच्यासाठी शुभ की अशुभ? वाचा आजचे अंकभविष्य

Ank Shastra 22 May 2024 : बुधवारचा दिवस तुमच्यासाठी शुभ की अशुभ? वाचा आजचे अंकभविष्य

May 22, 2024 11:03 AM IST

Ank Bhavishya 22 May 2024 : अंकभविष्यात १ ते ९ असे एकूण नऊ मूलांक असतात.आज बुधवारचा दिवस कोणत्या मूलांकासाठी कसा असणार हे जाणून घ्या.

अंकभविष्य २२ मे २०२४
अंकभविष्य २२ मे २०२४

ज्याप्रमाणे राशिभविष्यात नावावरुन राशी असते, त्याप्रमाणेच अंकभविष्यात मूलांक असते. या मूलांकावरुन तुमच्या दैनंदिन घडामोडींबाबत अंदाज दर्शविला जातो. अनेकांना मूलांक म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडतो. तर तुमच्या जन्म तारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्यालाच मूलांक असे म्हटले जाते. अंकभविष्यात १ ते ९ असे एकूण नऊ मूलांक असतात. आज बुधवारचा दिवस कोणत्या मूलांकासाठी कसा असणार हे जाणून घेऊया.

मूलांक १

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. त्यामुळे मनःशांती लाभेल. घरातील महिला एखाद्या मंगल कार्यामध्ये व्यग्र राहतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

मूलांक २

मूलांक २ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळू शकतो. तुमच्या हातून आज घराची डागडूजी होऊ शकते. लांबच्या प्रवासाचा योग आहे. मात्र वाहन सावकाश चालवा.

मूलांक ३

मूलांक ३ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. एखाद्या कार्यात अनेक दिवसांपासून येत असलेल्या अडचणी आज दूर होतील. त्यामुळे मानसिक स्थिती उत्तम राहील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. अथवा जुनी दुखणी पाठ धरतील.

मूलांक ४

मूलांक ४ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी अडचणी आल्या तरी स्वतः धैर्याने उभे राहणे गरजेचे आहे. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने प्रसिद्धीझोतात याल. लोकांकडून मानसन्मान प्राप्त होईल.

मूलांक ५

मूलांक ५ च्या लोकांना आजचा दिवस थोडासा त्रासदायक असेल. हातात घेतलेल्या कामात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक पाऊले उचला. कुटुंबातील सदस्यांना दिलेले वचन पूर्ण करण्यास आज अक्षम राहाल. त्यामुळे घरात नाराजीचा सूर उमटेल. मात्र घर घेण्याची इच्छा आज पूर्ण होईल.

मूलांक ६

मूलांक ६ असणाऱ्या लोकांना आजचा दिवस उत्तम असणार आहे. पैसे कमावण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या लोकांना लाभ मिळणार आहे. तुमच्या लाइफस्टाइलमध्ये डाएट आणि व्यायामाचा समावेश आवश्यक आहे. त्यामुळे नवा उत्साह जाणवेल. ऑफिसच्या कामाचा कंटाळा आला तरी काळजीने काम पूर्ण कराल.

मूलांक ७

मूलांक ७ च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज कुटुंबाला पुरेसा वेळ देणे फलदायी ठरणार आहे. जवळच्या लोकांशी मनमोकळा संवाद होऊन नातेसंबंध सुधारतील. कामानिमित्त परदेशी जाण्याचा योग आहे. स्थावर इस्टेटीसंबंधित वाद आज संपुष्ठात येऊन आर्थिक लाभ मिळेल.

मूलांक ८

मूलांक ८ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून आज दुप्पट फायदा मिळू शकतो. एखादी जमीन खरेदी करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. आज लोकांच्या गाठीभेटी घेऊन सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.

मूलांक ९

मूलांक ९ असणाऱ्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फलदायी असणार आहे. आज शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विचार करावा लागेल. अथवा नुकसान होऊ शकते. काही लोक आज सुट्टीसाठी बाहेर जाण्याची योजना करु शकतात.

WhatsApp channel
विभाग