मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार आजचा शुक्रवारचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार आजचा शुक्रवारचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 22, 2024 12:13 PM IST

Ank Bhavishya 22 march 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा फाल्गुन शुक्ल त्रयोदशीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

अंक भविष्य २२ मार्च २०२३
अंक भविष्य २२ मार्च २०२३

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुयम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २२ असेल तर तुमचा मूलांक २+२=४ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. गुरुवार २२ मार्च २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

पैसे येण्याची शक्यता आहे आणि तुम्ही मित्रांसोबत होळी देखील साजरी कराल. आज पालकांच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यास मानसिकदृष्ट्या तुम्हाला खूप आनंद वाटेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.

मूलांक २- 

आज तुमच्या प्रभावात चांगली वाढ होईल आणि तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशीही भेट होऊ शकते. नवविवाहित लोकांच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होऊ शकते, ज्यामुळे कुटुंबाच्या आनंदात वाढ होईल.

मूलांक ३- 

विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते, ज्यामुळे ते पूर्ण लक्ष देऊ शकणार नाहीत. यावेळी, आपण आपल्या सभोवतालच्या लोकांशी सुसंवाद साधला पाहिजे.

मूलांक ४- 

आर्थिक बाबतीत तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. आज कुठेही पैसे गुंतवणे टाळा. कोणावरही लवकर विश्वास ठेवू नका आणि विचाराने काम करा.

मूलांक ५- 

तुम्हाला एखाद्याबद्दल अधिक आकर्षण वाटेल, परंतु तुमचे समर्पण इतरांना दिसणार नाही. आज तुमच्या नियोजित कामात अनावश्यक अडथळे तुमचे लक्ष विचलित करू शकतात. आज तुमचा कुटुंबातील सदस्यांशी काही मुद्द्यावर वाद होऊ शकतो.

मूलांक ६- 

तुमचे पैसे हुशारीने गुंतवा अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. तुमच्या वागण्याने इतरांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल आणि या वादविवादापासून दूर राहावे. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या.

मूलांक ७- 

व्यवसाय प्रगतीसाठी नवीन मार्गांचा विचार करू शकता जे खरोखर खूप फायदेशीर ठरतील. आज कोणाचा तरी सल्ला उपयोगी पडू शकतो, ज्यामुळे अनेक कामे पूर्ण होण्यास मदत होईल. कौटुंबिक सदस्यांसोबत आजचा दिवस आनंदात जाईल.

मूलांक ८- 

घरातील एखाद्याच्या तब्येतीबद्दल आज तुम्ही थोडे चिंतेत असाल. आज तुमचा दिवस कुटुंबातील सदस्यांसोबत व्यस्त जाईल. प्रवासाचे बेत पुढे ढकलले जाऊ शकतात. तुम्हाला घरातील कामातून फारसा आराम मिळणार नाही. आज तुमचा पैसा हुशारीने गुंतवा.

मूलांक ९- 

कामानिमित्त प्रवासाची संधी मिळेल. तुमचे काम हळूहळू पुढे जाईल. विद्यार्थ्यांना आज संशोधनाच्या काही नवीन संधी मिळतील. अविवाहित लोकांना आज कोणी खास भेटू शकते.

WhatsApp channel

विभाग