मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार सर्व मूलांकासाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार सर्व मूलांकासाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 22, 2024 11:49 AM IST

Ank Bhavishya 22 january 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा आजचा दिवस कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

Numerology Horoscope
Numerology Horoscope

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २२ असेल तर तुमचा मूलांक ४ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. सोमवार २२ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

आजचा दिवस आनंदाचा राहील. आरोग्यात सुधारणा राहील. जोडीदाराकडून आश्चर्यचकीत भेट मिळेल. आर्थिक स्थिती थोडी बिघडू शकते. शारीरिक आरोग्यावर लक्ष द्या. आरोग्याच्या तक्रारी त्रासदायक ठरणार नाही.

मूलांक २- 

आजचा दिवस चांगला जाईल. करिअरमध्ये वरिष्ठांसोबत सुरू असलेले वाद-विवाद दूर होतील. प्रेम जीवन रोमॅंटीक राहील. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आनंदी व तंदरूस्त राहाल.

मूलांक ३- 

मानसिक आरोग्याची काळजी घ्या. मित्र-परिवारासोबत असलेल्या आर्थिक अडचणी दूर करून घ्या. तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. चिंतामुक्त राहण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक व वयक्तिक जीवनात संतुलन ठेवा.

मूलांक ४- 

चढ-उताराची स्थिती राहील. कार्यक्षेत्रातील राजकारणापासून दूर राहा. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. आज मोठी आर्थिक गुंतवणूक करू नका. जोडीदाराच्या भावना दुखावू नका.

मूलांक ५ - 

तुमचे लक्ष तुमच्या कामावर राहील. आपले आरोग्य सुदृढ ठेवा. नात्यात दुरावा आला असेल तर जोडीदारासोबत वेळ घालवा. मीटिंग मध्ये भाग घेताना चौफेर विचार करणे आवश्यक आहे.

मूलांक ६- 

आज तणावात्मक वाटू शकते. कामाचा बोजा जास्त राहील. काहींना जोडीदाराच्या कुटूंबासोबत अडचणी येऊ शकतात. तुमच्यात प्रत्येक अडचणीवर मात करण्याची क्षमता आहे. तुमच्या कलागुणांचा वापर करा.

मूलांक ७ - 

आजचा दिवस सामान्य राहील. धनलाभाची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत जोखीम घेऊ नका. खाण-पाण निरोगी ठेवा. विनाकारणचा तणाव करू नका. यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सकारात्मक ठेवा.

मूलांक ८- 

दिवस सकारात्मक राहील. व्यवसाय करणाऱ्यांना देश-विदेशातून संधी मिळू शकते. पैसा हाती येईल पण खर्चही वाढतील. बाहेरचे खाणे-पिणे टाळा. स्पर्धापरिक्षेत बसलेल्या विद्यार्ध्यांना अभ्यासात लक्ष देणे गरजेचे आहे.

मूलांक ९- 

आर्थिक बाबतीत सावध राहा. करिअरमध्ये लहान-मोठे चढ-उतार येऊ शकतात. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचे नियोजन करा. कार्यक्षेत्रातील राजकारण तुमच्या विरोधात राहील. सकारात्मक राहा.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग