तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २२ असेल तर तुमचा मूलांक २+२=४ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. सोमवार २२ एप्रिल २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन या सर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
आज उर्जेने परिपूर्ण असाल. नशीबाची साथ लाभेल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही दीर्घकाळ काम करत होता त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही ऑफिसमध्ये हिरोसारखे काम कराला व कौतुक मिळवाल.
व्यवसायाशी संबंधित निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही असे निर्णय घेऊ शकता ज्यामध्ये तुमचे कुटुंबीय देखील तुम्हाला साथ देतील आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तुम्हाला भविष्यात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
भाग्य तुम्हाला साथ देईल. सर्व दिशांकडून पैशाचा ओघ होईल, ज्यामुळे तुम्ही समाधानी असाल. तुम्हाला हवे ते विकत घेऊ शकता. याशिवाय तुमची अनेक प्रलंबित कामेही आज पूर्ण होतील.
आजचा दिवस खूप चांगला जाईल. पण तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतील, ज्यामुळे तुम्हाला संध्याकाळी खूप थकवा जाणवेल. घरामध्ये तणावाचे वातावरण असू शकते, परंतु जर तुम्ही संयम राखलात तर समस्येचे निराकरण होऊन जाईल.
आज संपूर्ण दिवस अभ्यासात जाईल. त्याचबरोबर सरकारी नोकरीसाठी मेहनत करणाऱ्या लोकांनाही सुवर्णसंधी मिळू शकते. मेहनत करत राहा, आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
बदलाशी ताळमेळ ठेवा. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल आणि सर्व जुनी कटुताही दूर होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना आज फायदा होईल.
आज तुम्ही व्यवसायात इतके मग्न असाल की तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही. याशिवाय थकवा अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतो, त्यामुळे विश्रांतीसाठीही वेळ काढा.
आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता जाणवू शकते. आज तुम्ही जुन्या आठवणींमध्ये हरवून जाल. यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो, त्यामुळे वर्तमानात जगण्याची सवय लावा. यामुळे तुम्हाला आनंद होईल.
नोकरदार लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला नाही, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे.