तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २१ असेल तर तुमचा मूलांक ३ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ३ चा स्वामी ग्रह गुरु आहे. रविवार २१ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
आजचा दिवस खास राहील. आर्थिक परिस्थिती आधीपेक्षा चांगली राहील. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. धन हातात येईल पण खर्चही अधीक होईल. जोडीदारासोबत असलेले गैरसमज दूर करा.
दिवस आज सामान्य राहील. करिअर संबंधी दडपण वाटेल. बाहेरचे अन्न-पदार्थ खाणे टाळा. बढतीचे योग आहेत. आपल्या कामावर लक्ष ठेवा.वाहन चालवताना सांभाळून चालवा.
आजचा दिवस शुभ आहे. नवीन जबाबदारी राहील. आज कार्यक्षेत्रात वाद-विवादात पडू नका. आर्थिक स्थिती सुधारेल. मानसिक स्वास्थाची काळजी घ्या. आर्थिक येणी येतील. तुमच्या भावना इतरांसमोर मांडण्यात सक्षम आहात.
जीवनात चढ-उताराची स्थिती राहील. कार्यालयाच्या राजकारणात फसू नका. आपल्या जोडीदाराला डीनरवर घेऊन जाणे चुकीचे नाही. आरोग्यात सुधारणा होईल. आकस्मिक धनलाभाचे योग तयार होत आहे.
मूलांक ५ च्या लोकांच्या जीवनात थोडी गडबड राहील. तुम्हाला खूप विचारपूर्वक खर्च करण्याचा सल्ला दिला जातो. कोणी मित्र आज आर्थिक मदत मागू शकतो. कार्यक्षेत्रात राजकारण होऊ शकतं. आपलं खाण-पाण चांगलं ठेवा.
आजचा दिवस रोमॅंटिक राहील. एकाकी असणाऱ्यांची आपल्या आवडत्या व्यक्तिसोबत भेट होऊ शकते. तर लग्न झालेल्यांनी परस्पर वाद-विवाद करणे टाळावे. तुमचे लक्ष कामावर असले पाहीजे.काम जास्त असू शकते.
आजचा दिवस चांगला राहील. धनाचे आगमन होईल आणि आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नात्यात दुरावलेले असाल तर मागच्या गोष्टी उकलून काढू नये, यामुळे जीवनात शांतताभंग होऊ शकते. आरोग्यावर लक्ष केंद्रित करा.
दिवस ताण-तणावात्मक राहू शकतो. कामाचा ताण वाढू शकतो. काम करताना मध्ये थोडा वेळ थांबून घ्यावे. वैवाहीक जीवनात परस्पर नातं फार चांगलं राहील. आरोग्याच्या तक्रारी असू शकतात. बाहेरचे खाण-पाण टाळा.
आजचा दिवस शुभ राहील. गुंतवणूकीतून चांगला मोबदला मिळू शकतो. पैसा हाती येईल पण खर्चही वाढतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कुटूंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी चांगले राहील.