तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २१ असेल तर तुमचा मूलांक २+१= ३ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ३ चा स्वामी ग्रह गुरु आहे. बुधवार २१ फेब्रुवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
तुमच्यासाठी पैशांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे आणि गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारसरणीमुळे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील.
दिवस सकारात्मक परिणाम देईल. तुमच्या मित्रांच्या सहकार्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला आता पैसे कमावण्याच्या साधनाच्या शोधात पुढे जायला आवडेल. कौटुंबीक वातावरण आनंददायी होईल. खूप दिवसापासून अडकलेले धन अचानक मिळू शकते.
नात्यात थोडा तणाव दिसून येईल. घाईघाईत कामे करणे टाळा अन्यथा नुकसान होऊ शकते. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. मुलांच्या काही कामामुळे धावपळ होण्याची परिस्थिती निर्माण होईल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील.
व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला जाईल, व्यवसायात चांगली प्रगती झाली आहे. आज समाजात तुमचे नाव आणि प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवाल. आज तुम्हाला बाहेरच्या कार्यात यश मिळू शकते.
आज तुम्ही लोकांना कोणत्याही प्रकारचे सल्ले देणे टाळावे, अन्यथा शेवटी तुम्ही चुकीचे सिद्ध होऊ शकता. कोणाशीही उद्धटपणे बोलू नका, अन्यथा त्यांना तुमच्याबद्दल वाईट वाटू शकते. कामकाजात अडचण येऊ शकते.
तुमच्या भावंडासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करताना संयम ठेऊन बोला. इतरांच्या कामाबरोबरच स्वतःच्या कामावर लक्ष द्या, अन्यथा यावेळी तुमचे विरोधक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.
कुटुंबातील सदस्यांसह फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. तुमच्या मुलांना दिलेले कोणतेही वचन तुम्हाला पूर्ण करावे लागेल. तुमच्या मनातील कोणत्याही इच्छेवर चर्चा करू शकता. नोकरदार आणि व्यावसायिकांना आज चांगला फायदा होईल.
कोणतेही काम करण्यापूर्वी थोडा विचार करूनच पुढे जा आणि भावनांच्या प्रभावाखाली काम करणे टाळा, अन्यथा तुम्हाला आणखी अडचणींना सामोरे जावे लागेल. मुलांकडून तुमच्यावर अधिक दबाव येऊ शकतो.
आज तुम्ही कामातून काही वेळ टाइमपास करू शकता, अशा परिस्थितीत निष्काळजीपणामुळे तुमचे काम अपूर्ण राहू शकते. तुमच्या सहकाऱ्याकडून तुम्हाला खूप मदत मिळू शकते. आज तुम्हाला काही नवीन काम शिकण्यात अडचणी येऊ शकतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या