तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख २ असेल तर तुमचा मूलांक २ आहे. अंकशास्त्रात, मूलांक २ चा स्वामी ग्रह चंद्र आहे. शुक्रवार २ फेब्रुवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
जोडीदारासोबत वाद विवाद होण्याची शक्यता आहे. शांतचित्ताने आणि भावनांवर नियंत्रण ठेवून निर्णय घेतला तर चांगले होईल. आज जास्त खर्च होईल यामुळे चिंता करत बसाल. नवीन प्रकल्पाची जबाबदारी दिली जाईल पण तुम्ही त्याचा ताण करून घ्याल. व्यापार वाढीची शक्यता राहील.
नशिबाची उत्तम साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. करिअर मध्ये येणाऱ्या अडचणी होऊन यशाचा मार्ग सापडेल. तुमच्या अति रागामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो म्हणून रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत नवीन मार्ग नफा मिळवून देणारा ठरेल.
कार्यक्षेत्रात विनाकारणच्या वादाला दुर्लक्ष करा आणि तुमच्या कामावर लक्ष द्या. आर्थिक स्थिती चांगली आहे परंतू एखाद्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी यामुळे तुमचा आर्थिक स्थर उंचावेल. आज कुटुंबातील वातावरण प्रसन्न करणारे राहील. तुम्हाला आप्तस्वकीय मदत करतील.
नात्यातील दुरावा संपेल आणि जीवनात आनंदी आनंद येईल. नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. धन लाभाचा दिवस आहे पण धावपळीत घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठिंबा प्रगतीसाठी प्रभावी ठरेल.
आज फार व्यस्त दिवस असेल. कार्यक्षेत्रात जास्त जबाबदारी दिली जाऊ शकते, यामुळे तुम्ही जास्त ताण करून घ्याल. परंतू यामुळे पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक वृद्धी होईल तसेच, वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
आजचा दिवस सामान्य राहील. वाहन चालवताना सांभाळून चालवा. शांत राहून विचारपूर्वक निर्णय घ्यावा, भावनिक होऊन घेतलेला निर्णय नुकसानाला कारणीभूत ठरू शकतो. नकारात्मक शक्तीचा प्रभाव होऊ देऊ नका. व्यवसाय वाढीच्या संधी मिळतील. जुन्या मित्रमैत्रिणी भेटण्याची शक्यता आहे.
आज तुम्ही फार उत्साही असाल. कार्यक्षेत्रात मनासारखे यश मिळेल. वाद टाळा, सकारात्मक राहा, कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. बराच काळ ज्या अडचणींना सामोरे जात होते त्यातून मार्ग सापडेल. कोर्ट कचेरी संबंधित काही निकाल लागणार होता तर तो तुमच्या बाजूने लागेल. तुमचे कार्य कोतुकास्पद असेल.
आरोग्य सुदृढ होईल. नवीन आर्थिक मार्गाचा लाभ होईल. कामकाज आणि व्यावसायिक वातावरण तुम्हाला हवे तसे राहील. परंतू घाईगडबडीत निर्णय घेतांना थोडा विचार करून निर्णय घ्यावा. नवीन काही सुरू करणार असाल तर त्यासंबंधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
आजचा दिवस चढ- उताराचा राहील. कामाचा जास्त त्रास करून घेऊ नका. आर्थिक स्थिती चांगली असेल आणि जुन्या गुंतवणूक मधून नफा मिळेल. परंतू खर्च वाढतील. विरोधक आणि प्रतिस्पर्धी यामुळे कामकाजात आव्हानाची परिस्थिती निर्माण होईल.
संबंधित बातम्या