Numerology horoscope: जन्मतारखेनुसार सर्व मूलांकासाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या अंकभविष्य-ank jyotish 19 january 2024 numerology horoscope mulank 1 to 9 ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार सर्व मूलांकासाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार सर्व मूलांकासाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या अंकभविष्य

Jan 19, 2024 11:27 AM IST

Ank Bhavishya 19 january 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल हे पाहता येते. तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमच्यासाठी दिवस कसा राहील.

Numerology horoscope
Numerology horoscope

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १९ असेल तर तुमचा मूलांक १ आहे. अंकशास्त्रात, मूलांक १ चा स्वामी ग्रह सूर्य आहे. शुक्रवार १९ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

रोज व्यायम केला पाहिजे. कोणत्याही संपत्ती संबंधी सौदा टाळा. कार्यक्षेत्रात व नोकरीसंबंधी योग्य निर्णय घेतल्यास परिस्थितीत संतूलन राहील. एखादी कौटुंबीक अडचण निर्माण होऊ शकते.

मूलांक २- 

वित्तीय बाजारात पैसा अडकवत असाल तर सतर्क राहा, भाग्यात चढ-उताराची परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. कोणत्याही कामकाजात लक्ष दिल्यास तुम्ही भरपूर काही मिळवू शकतात. वेळेचा सदुपयोग करा, घाईगडबड टाळा.

मूलांक ३- 

व्यायामामुळे तंदरुस्त राहाल. आज नोकरीसाठी मुलाखत दिल्यास यश मिळेल. एखाद्या दुसऱ्या मार्गाने आर्थिक मदत मिळू शकते. कुटूंबातील वाद-विवाद संपवण्यासाठी तुम्ही महत्वाची भुमीका घ्याल.

मूलांक ४- 

कुटूंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचे नियोजन कराल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही केलेल्या कामगिरीचे उत्तम फळ मिळेल, पण निर्णय घेण्यात दिरंगाई करू नका. घरी मंगलकार्याचे आयोजन कराल. व्यवसाच चांगला राहील.

मूलांक ५ - 

लांबच्या प्रवासाचा लाभ मिळेल. व्यायाम करा, आरोग्य चांगले राहील. मालमत्ता खरेदी करू इच्छित असाल तर चौफेर विचार करा व बारीक बारीक गोष्टींचा आढावा घेण्याची गरज आहे. आरोग्यासंबंधी तक्रारी तुमचे मानसिक संतूलन बिघडवू शकते.

मूलांक ६- 

तुमच्या चुकीमुळे आर्थिक देणी-घेणीवर परिणाम होऊ शकतो. कार्यक्षेत्रात प्रगतीत अडथळे आल्यामुळे चिंता वाढू शकते. तुमच्या मताला कुटूंबातील कोणत्याही सदस्याचा पाठींबा राहणार नाही.

मूलांक ७ - 

संपत्तीसंबंधी बाबी सामंजस्याने सोडवाल. विनाकारण वाद-विवाद वाढवू नका व रागरुसवा करू नका. व्यवसायात वृद्धी होईल. धावपळ अधिक होईल.

मूलांक ८- 

आत्मविश्वास ठेवा. मनात चढ-उतार राहतील. नोकरीत प्रगतीच्या संधी आहेत. आर्थिक वृद्धी होईल. वाहन खरेदीचे शुभ योग आहेत.

मूलांक ९- 

मनात इच्छा-अपेक्षा असतील. स्वत:वर संयम राखा. व्यवसायासंबंधी धावपळ होऊ शकते. वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या. जीवनशैली कष्टदायक असेल.

विभाग