मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार सर्व मूलांकासाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार सर्व मूलांकासाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 17, 2024 09:59 AM IST

Ank Bhavishya 17 january 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल हे पाहता येते. तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमच्यासाठी दिवस कसा राहील.

Numerology horoscope
Numerology horoscope

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १७ असेल तर तुमचा मूलांक १+७=८ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ८ चा स्वामी ग्रह शनि आहे. बुधवार १७ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

आर्थिक आवक वाढवण्यासाठी तुम्ही अनेक मार्ग अवलंबत आहात. जे परिक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी चांगली वेळ आहे, यश मिळण्याचे अपेक्षा आहे. व्यवसाय चांगला सुरू आहे. कुटूंबात मंगलकार्य होतील.

मूलांक २- 

चिंतीत असाल. आतापासून भविष्यासाठी बचत करा. आरोग्या आधीपेक्षा चांगले राहील. संपत्ती संबंधी चांगला सौदा मिळेल त्यावर विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतात.

Horoscope Today 17 January 2024: उद्योग क्षेत्रात तेजीचा दिवस! मेष ते मीन राशींचे वाचा राशीभविष्य!

मूलांक ३- 

चुकीचा निर्णय आर्थिक बाबतीत नुकसानदायक ठरू शकतो. मोठे निर्णय घ्यायचे टाळा. प्रवासात सावध राहा. संपत्ती घेण्याचे नियोजन तयार कराल.

मूलांक ४- 

आरोग्यासंबंधी तक्रारींची सुरवात आहे. संतूलन ठेवणे गरजेचे आहे. प्रेमजीवनात प्रेमाने नाते सांभाळा, वाद-विवाद टाळा. बोलण्यात गोडवा ठेवा.

मूलांक ५ - 

घरी मंगलकार्य होतील. व्यवसाय चांगला चालेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. धोकादायक खेळापासून लांब राहा. आर्थिक देणी-घेणीत तेजी तुमच्या हितात राहील.

मूलांक ६- 

खाण्या-पिण्याची पथ्य पाळा. व्यावसायिक स्तरावर तुमची बाजारात खूप मांगणी आहे. सुट्या यशस्वी व आनंददायक ठरतील. संपत्ती संबंधी एखादी गोष्ट चिंतीत करेल.

Todays Panchang पंचांग १७ जानेवारी २०२४: पौष शुक्ल सप्तमी ; पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

मूलांक ७ - 

दिवस फार चांगला राहील. करिअरमध्ये कामाचा जास्त ताण राहील. आर्थिक बाबतीत आधीपेक्षा चांगला काळ राहील. घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे वाढते गैरसमज दूर करा.

मूलांक ८- 

सामान्य दिवस राहील. आरोग्याची खास काळजी घ्यावी आणि बाहेरचे अन्न पदार्थ खाणे टाळा. हाती पैसा येईल पण खर्चही वाढतील. कामावर लक्ष केंद्रित करा. वाद-विवाद टाळा.

मूलांक ९- 

दिवस शुभ राहील. प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. नवीन जबाबदारी मिळेल. आर्थिक स्थिती चढ-उताराची राहील. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना सावध राहा.

विभाग