मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ank Shastra 16 May 2024 : गुरुवारच्या दिवशी कोणता अंक तुमच्यासाठी आहे शुभ? वाचा आजचे अंकभविष्य

Ank Shastra 16 May 2024 : गुरुवारच्या दिवशी कोणता अंक तुमच्यासाठी आहे शुभ? वाचा आजचे अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 16, 2024 11:24 AM IST

Ank Bhavishya 16 May 2024 : आज गुरुवार १६ मे २०२४ रोजी लक्ष्मी ध्रुव योग जुळून आला आहे. या शुभ योगामुळे काही मूलांकाच्या लोकांना धनलाभ होणार आहे.

अंकज्योतिषशास्त्र, अंकभविष्य, अंकशास्त्र १६ मे २०२४
अंकज्योतिषशास्त्र, अंकभविष्य, अंकशास्त्र १६ मे २०२४

अंक शास्त्रानुसार आज गुरुवार १६ मे २०२४ रोजी लक्ष्मी ध्रुव योग जुळून आला आहे. या शुभ योगामुळे काही मूलांकाच्या लोकांना धनलाभ होणार आहे. तर काहींना कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या पदरात पडणार आहेत. अंक भविष्यानुसार कोणत्या मूलांकासाठी आज दिवस कसा जाणार याबाबत जाणून घेऊया.

मूलांक १

आजचा दिवस मूलांक १ च्या लोकांसाठी सामान्य असणार आहे. आज आर्थिकदृष्ट्या तुमची स्थिती स्थिर राहील. आज अध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाटेल. एखाद्या धार्मिक कार्यात पैसे खर्च कराल. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात दिसून येईल. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज व्यवहारात बक्कळ पैसा मिळेल. त्यामुळे मन उत्साही राहील.

(कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९, २८, तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो )

शुभ अंक- ३

शुभ रंग-हिरवा

मूलांक २

मूलांक २ च्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. पैसे कमावण्याचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध सुधारतील. तुमच्या लहान-मोठ्या प्रत्येक निर्णयात कुटुंबातील सदस्य तुमच्या पाठीशी राहतील.

नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस खास आहे. नोकरी बदलाच्या विचारात असलेल्यांना आज निर्णय घेण्यास सुलभ होईल. (कोणत्याही महिन्याच्या २,११,२०,२९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असेल)

शुभ अंक- १२

शुभ रंग- पांढरा

मूलांक ३

आजचा दिवस मूलांक ३ च्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. आर्थिकदृष्ट्या तुमची प्रगती होऊ शकते. आज अजिबात पैशांची कमतरता भासणार नाही. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने मन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी इतरांवर तुमचा प्रभाव वाढेल. वरिष्ठांना खुश करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबासोबत खेळीमेळीत दिवस जाईल. (कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१,३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो)

शुभ अंक- ६

शुभ रंग- गुलाबी

मूलांक ४

मूलांक ४ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असणार आहे. आज मोठी आर्थिक अडचण उद्भवू शकते. कोणत्याही क्षेत्रात आज गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. अथवा नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्याची योजना बनू शकते. (कोणत्याही महिन्याचा ४, १३, २२, ३१ या तारखेला लोकांचा मूलांक ४ असतो)

शुभ अंक- ४

शुभ रंग- पिवळा

मूलांक ५

आज गुरुवारचा दिवस मूलांक ५ असणाऱ्या लोकांसाठी थोडा अडचणींचा असणार आहे. अचानक मोठा खर्च निघू शकतो. त्यामुळे तुम्हाला पैशांची चणचण भासेल. उद्योग-व्यापारात आज कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. जोडीदारासोबत आज मनमोकळेपणाने संवाद होईल. त्यामुळे नाते आणखी दृढ होईल. (कोणत्याही महिन्याचा ५,१४,२३ तारखेला जन्मलेल्या मूलांक ५ असतो.)

शुभ अंक-८

शुभ रंग-भगवा

मूलांक ६

मूलांक ६ च्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. पैशांची कमी भासणार नाही. मुलाच्या सल्ल्याने आर्थिक गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ चांगला जाईल. जोडीदारासोबत आज उत्तम संवाद होऊन प्रेम वाढीस लागेल.

शुभ अंक-३

शुभ रंग-पिवळा

मूलांक ७

मूलांक ७ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्णत्वास जातील. त्यामुळे मनःशांती लाभेल. दिवसभर उत्साही आणि आनंदी राहाल. कामाच्या ठिकाणी नव्या संधी प्राप्त होतील. (कोणत्याही महिन्यात ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.)

शुभ अंक-३

शुभ रंग- निळा

मूलांक ८

आजचा दिवस मूलांक ८ असणाऱ्या लोकांसाठी उत्तम आहे. एखादी स्थावर संपत्ती खरेदी करण्यात पैशाची गुंतवणूक कराल. व्यापाराच्या दृष्टीने आजचा दिवस फलदायी आहे. आज मिळकतीचे नवे मार्ग खुले होतील. कुटुंबासोबत मनमोकळ्या गप्पा रंगतील. (कोणत्याही महिन्याच्या ८, १७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.)

शुभ अंक-९

शुभ रंग- राखाडी

मूलांक ९

मूलांक ९ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. अचानक धनलाभ होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तसेच एखाद्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घ्याल. येणाऱ्या काळात ही गुंतवणूक फायदेशीर ठरेल. महत्वाच्या कामात भावंडांचा पाठिंबा मिळेल. जोडीदारासोबत काहीसा मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे योग्य ठरेल. (कोणत्याही महिन्याच्या ९, १८,२७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)

शुभ अंक-३

शुभ रंग- निळा

WhatsApp channel

विभाग