तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १६ असेल तर तुमचा मूलांक १+६=७ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ७ चा स्वामी ग्रह बुध आहे. मंगळवार १६ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
कोणत्याच कामासाठी वेळ मिळणार नाही आज तुम्ही व्यस्त असाल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. नेकरीत चांगला काळ आहे. याशिवाय प्रेम जीवनात संतूलन ठेवाल.
करिअरसंबंधी आज चांगला दिवस आहे. वरीष्ठ अधिकारी तुमचे इतरांकडे कौतूक करतील. व्यवसाय करणाऱ्यांनी थोडे सावध राहा. प्रेमजीवनाच्या बाबतीत सांभाळून राहा, तीसरा व्यक्ती तुमच्या प्रेम जीवनात येऊ शकतो.
नोकरीसाठी परिक्षा दिली असेल तर चांगले परिणाम येतील. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. कोणत्याही बाबतीत अतीरेक करणे टाळा. दुसऱ्यांचा हेवा करू नका, यामुळे तुम्ही हताश व्हाल.
जे तुमच्याजवळ आहे त्यातच खुश राहा. कुटूंबासाठी वेळ काढा. कुटूंबात सर्व व्यवस्थित करायचे आहे. व्यापारी असाल तर चांगली वृद्धी पाहायला मिळेल. बचत करा.
स्पर्धेत भाग घेत असाल तर यात पुढे जाणे कठीण होऊ शकते. आर्थिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो.
एखादा व्यक्ती सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यासाठी तुमच्याजवळ येऊ शकतो. तुम्ही निराश असाल तर तणावात सौदा कराल. वेळेत काम करा. नाहीतर वरीष्ठांच्या नजरेत चुकीचे ठरू शकतात.
आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्हाला केलेले नियोजन लांबणीवर टाकावे लागेल. नोकरीला घेऊन तुम्ही ज्या संधीची वाट बघत होतात ती भेटेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
ज्या योजनेवर फार काळापासून विचार करत होतात त्यात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना तुम्ही आधीच केली असेल, तर तयार राहा. जवळचे नातेवाईक मदत करतील.
एखादा व्यक्ती जो तुमच्यावर रागावला होता तो व्यक्ती आज मैत्रीचा हात पुढे करेल. एखाद्या विशिष्ट कार्यासाठी कोणाची मदत घेणे कठीण होऊ शकते.
संबंधित बातम्या