तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १५ असेल तर तुमचा मूलांक १+५=६ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ६ चा स्वामी ग्रह शुक्र आहे. जाणून घ्या १ ते ९ सर्व मूलांकासाठी कार्तिक पौर्णिमेचा दिवस कसा जाईल.
मूलांक १ चा दिवस सामान्य राहील. पैशांशी संबंधित समस्या संपुष्टात येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. व्यापाऱ्यांची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. वादविवाद टाळा, अन्यथा कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी अधिक काम होऊ शकते.
आज मूलांक २ च्या लोकांना नशीब साथ देईल. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी निर्माण होतील. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवता येईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे.
मूलांक ३ च्या लोकांसाठी लाभदायक दिवस आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदारात सुरू असलेले मतभेद संपुष्टात येऊ शकतात. खर्च जास्त राहील. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील.
मूलांक ४ च्या लोकांसाठी दिवस उत्तम असणार आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नशिबाची साथ मिळेल. व्यवसायाच्या अनुषंगाने प्रवास करावा लागू शकतो. जमीन, इमारत आणि वाहन खरेदीची शक्यता आहे. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.
मूलांक ५ राशीच्या लोकांसाठी दिवस मध्यम फलदायी ठरणार आहे. पैशांची गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. कार्यालये राजकारणाला बळी पडू शकतात, त्यामुळे कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. आर्थिक दृष्ट्या चांगला जाणार आहे. नोकरीत पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होईल. मन प्रसन्न राहील.
मूलांक ६ च्या लोकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. आकस्मिक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील, जुन्या स्त्रोतांमधूनही पैसा येईल. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. वाणीत सौम्यता राहील. मित्राच्या मदतीने पैसे मिळू शकतात.
मूलांक ७ च्या लोकांसाठी दिवस अनुकूल असणार आहे. आज तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. काही जातकांचे लग्नही ठरलेले असू शकते. अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. कुटुंबात धार्मिक उपक्रम होऊ शकतात.
मूलांक ८ च्या लोकांसाठी दिवस संमिश्र फलदायी ठरणार आहे. पैशाची गुंतवणूक तुमच्यासाठी निषिद्ध असेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. आर्थिक दृष्ट्या दिवस सामान्य राहील. नवीन व्यवसाय सुरू करता येईल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल.
मूलांक ९ च्या लोकांसाठी दिवस लाभदायक ठरणार आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक ऊर्जावान आणि आत्मविश्वासी असाल. नोकरीबदलासाठी वेळ अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. मन प्रसन्न राहील. नोकरीची व्याप्ती वाढू शकते. व्यवसायानिमित्त परदेश प्रवास लाभाच्या संधी उपलब्ध करून देईल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)