आज बुधवार १५ मे २०२४ रोजी जोतिषशास्त्रात लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती होत आहे. हा योग अंकभविष्यानुसार काही मूलांकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. तर काही मूलांकांसाठी सामान्य स्वरुपाचा असणार आहे. राशिभविष्याप्रमाणेच अंकभविष्यसुद्धा तितकेच महत्वाचे आणि प्रभावी आहे. यामध्ये व्यक्तींच्या जन्म तारखेच्या अंकांच्या बेरजेवरुन जो अंक प्राप्त होतो त्याला मूलांक असे म्हणतात. अंकशास्त्रात एक ते नऊ मूलांक असतात. आजचा दिवस या नऊ मूलांकांसाठी कसा जाणार? आणि कोणता अंक आणि रंग तुमच्या लकी ठरणार याबाबत जाणून घेऊया.
आजचा दिवस मूलांक १ च्या लोकांसाठी काहीसा त्रासदायक असणार आहे. कामामध्ये अडचणी येऊ शकतात. एखादी मोठी समस्या असेल तर, संयम ठेऊन त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. अथवा मानसिक त्रास उद्भवू शकतो. (कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९, २८, तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो )
शुभ अंक- ४
शुभ रंग-जांभळा
मूलांक २ च्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. काही लोकांच्या वागण्यामुळे मनावर ताण येण्याची शक्यता आहे. मात्र आज तुमच्या क्षेत्रामध्ये नव्या संधी उपलब्ध होतील. मिळालेल्या संधी योग्यरीत्या हाताळल्यास भविष्यात लाभ होईल. (कोणत्याही महिन्याच्या २,११,२०,२९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असेल)
शुभ अंक- १
शुभ रंग-भगवा
मूलांक ३ च्या लोकांसाठी आज बुधवारचा दिवस फारसा खास नसेल. आज हातात घेतलेली कामे रेंगाळतील. एखादी परिस्थिती हाताळण्यास कठीण जाईल. कोणतेही काम करताना इतरांची मदत घ्यावी लागेल आणि ते लाभदायीसुद्धा ठरेल. (कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१,३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो)
शुभ अंक-७
शुभ रंग-लाल
मूलांक ४ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. आज प्रगतीच्या मार्गावर तुमची पाऊले पडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. मात्र आर्थिक चणचण भासेल. (कोणत्याही महिन्याचा ४, १३, २२, ३१ या तारखेला लोकांचा मूलांक ४ असतो)
शुभ अंक-११
शुभ रंग-पांढरा
मूलांक ५ च्या लोकांना आज मनावर ताबा ठेवावा लागेल. दिवसभर मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. लवकरच तुमच्या अडचणी संपुष्ठात येऊन यश हाती लागेल. (कोणत्याही महिन्याचा ५,१४,२३ तारखेला जन्मलेल्या मूलांक ५ असतो.)
शुभ अंक-२
शुभ रंग-भगवा
मूलांक ६ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या कला कौशल्यांना नवी ओळख मिळेल. घरातील महत्वाच्या जबाबदाऱ्या स्वतः वर घ्याव्या लागतील. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. (कोणत्याही महिन्यात ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.)
शुभ अंक- ८
शुभ रंग- लाल
मूलांक ७ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कामाच्या बाबतीत अतिरिक्त ताण घेणे टाळा. नोकरीमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल. त्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतील. काम करताना बारकाईने लक्ष दिल्यास लवकर शुभ वार्ता मिळू शकते. (कोणत्याही महिन्याचा ७,१६,२५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो.)
शुभ अंक- ३
शुभ रंग- पिवळा
आजचा दिवस मूलांक ८ च्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. राजकीय क्षेत्रात असणाऱ्या लोकांना चांगले नेतृत्व करण्याची संधी मिळेल. मात्र विरोधकांना सोबत घेऊन वाटचाल करावी लागेल. (कोणत्याही महिन्याच्या ८, १७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.)
शुभ अंक-१०
शुभ रंग- हिरवा
मूलांक ९ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. रखडलेली कामे आज पूर्णत्वास जातील. लव लाईफबाबत अनेक विचार मनात घोळत राहतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. (कोणत्याही महिन्याच्या ९, १८,२७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)
शुभ अंक- ७
शुभ रंग- गुलाबी
संबंधित बातम्या