Numerology horoscope: जन्मतारखेनुसार आजचा दिवस या मूलांकासाठी लाभदायक, जाणून घ्या अंकभविष्य-ank jyotish 14 january 2024 numerology horoscope mulank 1 to 9 ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार आजचा दिवस या मूलांकासाठी लाभदायक, जाणून घ्या अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार आजचा दिवस या मूलांकासाठी लाभदायक, जाणून घ्या अंकभविष्य

Jan 14, 2024 11:41 AM IST

Ank Bhavishya 14 january 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल हे पाहता येते. तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल.

Numerology Horoscope
Numerology Horoscope

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १४ असेल तर तुमचा मूलांक १+४=५ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ५ चा स्वामी ग्रह बुध आहे. रविवार १४ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

आजचा दिवस भाग्यशाली राहील. कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल. कामाचे कौतुक होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक व्यवहार होत राहतील. मानसिक स्वास्थ सांभाळा.

मूलांक २- 

प्रेम जीवनात बदल घडतील. प्रेम जीवन, करिअर, आर्थिक परिस्थिती व आरोग्या संबंधीत अनेक बदलांना सामोरे जावे लागू शकते. आव्हानाला सामोरे जावे लागेल, पण लाभही होईल.

मूलांक ३- 

जीवनात बदल घडत राहतील. आर्थिक लाभ होईल परंतू खर्च पण वाढतील. सांभाळून खर्च करा. आरोग्याच्या तक्रारी असू शकतात , अडचणीवर मात करण्यासाठी मित्रमैत्रिणींची किंवा आपल्या जवळच्या व्यक्तिची मदत घ्या. कार्यक्षेत्रात काम करताना थोडा ब्रेक घ्यायला विसरू नका.

मूलांक ४- 

सकारात्मक ऊर्जा राहील. याचा चांगल्या गोष्टीत वापर करा. नात्यात दुरावा आला असेल तर जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी नवीन पर्याय शोधला पाहिजे. बाहेरचे अन्न-पदार्थ खाऊ नका. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका.

मूलांक ५ - 

तणावात्मक दिवस राहील. कामाचा जास्त ताण राहील. मानसिक व शारीरिक स्वास्थाची काळजी घ्या. तणाव दूर करण्यासाठी आवडत्या गोष्टीला वेळ द्या. मित्रमैत्रीण आणि जोडीदारासोबत आपल्या मनातले सांगितले तर चांगले राहील.

मूलांक ६- 

चांगल्या दिवसाचा लाभ घ्या. अचानक आर्थिक लाभ होईल. करिअरमध्ये मोठे आव्हान मिळू शकते. जे पदोन्नतीचे कारणही ठरू शकते. जीवनशैली आरोग्यदायी ठेवा. विवाहीत लोकांनी कार्यक्षेत्रात व्यवस्थित राहावे.

मूलांक ७ - 

प्रेमजीवनात अडचणींना सामोरे जावे लागेल. अडथळे निर्माण होतील ज्यामुळे नात्यात दुरावा येईल. गुंतवणूक करताना सांभाळून करा. फिरायला जात असाल तर काळजी घ्या. संपत्तीसंबंधी लक्ष द्या.

मूलांक ८- 

आव्हानांना सामोरे जातांना तुमच्या आर्थिक ताकदाचा वापर करा. वयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सांभाळून राहा. आजचा दिवस स्थिरता आणि संयमाचा राहील.

मूलांक ९- 

दिवस व्यस्त राहील. सिंगल असाल तर जीवनात चांगला बदल घडेल. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तिकडून होकार येईल किंवा भेट होईल. स्वतावर प्रेम करा. करिअरमध्ये कोणताही निर्णय घेताना चौफेर बाजूचा विचार करावा.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग