मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार विनायक चतुर्थीचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार विनायक चतुर्थीचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 13, 2024 01:58 PM IST

Ank Bhavishya 13 march 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा फाल्गुन शुक्ल चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

अंकभविष्य १३ मार्च २०२४
अंकभविष्य १३ मार्च २०२४

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १३ असेल तर तुमचा मूलांक १+३=४ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. बुधवार १३ मार्च २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

तुमच्या कामात काही अडचण येईल, त्यामुळे तुम्हाला घाई करावी लागेल. वडिलांच्या प्रकृतीबाबत सावध राहण्याची गरज आहे. आज तुमच्या जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे.

मूलांक २- 

धर्मादाय किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात देणगी म्हणून जमेल तेवढी गुंतवणूक करा, ते तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला सकारात्मक लोकांना भेटण्याची संधी मिळेल, जी तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल.

मूलांक ३- 

खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. आरोग्याची विशेष काळजी घ्या, श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल.

मूलांक ४- 

प्रलंबित कामे आज पूर्ण होऊ शकता. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन मार्गांचा विचार करू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत काही मनोरंजनाची योजना आखू शकता.

मूलांक ५- 

व्यावसायिकांना आज नफा मिळविण्याचा नवीन आणि चांगला मार्ग मिळण्याची शक्यता आहे. आज तुमच्याकडे पैसाही येत राहील. आजचा दिवस कौटुंबिक सदस्यांसोबत खूप चांगला जाईल.

मूलांक ६- 

तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. कोणत्याही गुप्त गोष्टी मित्रांना सांगणे टाळा, अन्यथा बदनामी होण्याची शक्यता आहे. अविवाहितांनी आज कोणतेही प्रेमप्रकरण टाळावे, अन्यथा मानसिक तणाव वाढू शकतो.

मूलांक ७- 

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना बनवू शकता, ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात जास्त भावनेने निर्णय घेऊ नका; तुम्ही जे काही बोलता ते विचारपूर्वक करा.

मूलांक ८- 

तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमचे चालू असलेले काम बिघडू शकते. वाहन जपून चालवा, अन्यथा इजा होण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांच्या वागण्याने तुम्ही अस्वस्थ राहू शकता. पैसे कोठेही गुंतवणे टाळा अन्यथा पैसे अडकू शकतात.

मूलांक ९- 

आज तुमचे विचार आणि शब्द दोन्ही नकारात्मकतेने भरलेले असतील, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज वैयक्तिकरित्या विशेष काळजी घ्या.

विभाग