तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १२ असेल तर तुमचा मूलांक १+२=३ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ३ चा स्वामी ग्रह गुरु आहे. मंगळवार १२ मार्च २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
आज दिवस सुखात व्यतीत होईल. व्यवसायसंबंधी कामकाजात व्यस्त असाल. संपर्काचा लाभ होईल. कार्यक्षेत्रात अपेक्षेप्रमाणे काम कराल. बुद्धी चातुर्याने कामकाज कराल. करिअर व व्यवसायात गती येईल.
आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर आज लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप आनंदी असाल आणि तुमच्या प्रगतीसाठी विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.
आर्थिक व्यवहार टाळा अन्यथा पैसे अडकू शकतात. नोकरदार लोकांना आज सहकाऱ्यांमुळे कामात अडचणी येऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावर वाद होऊ शकतात, ज्यामुळे संवाद काही काळ थांबेल.
तुमची आणि वडिलांची प्रकृती खराब राहू शकते, त्यामुळे तुम्ही चिंतेत राहू शकता. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. वाहन चालवताना काळजी घ्या आणि घाई टाळा.जोडीदारासोबत सुखद क्षण घालवाल.
व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला असेल, तुम्ही व्यावसायिक कामे अतिशय हुशारीने पूर्ण कराल, जे तुमच्या नजीकच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.
आज तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत राहू शकता. पैशाच्या दृष्टिकोनातून, आज तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह काही मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करू शकता. जोडीदारासोबत काही मतभेद होतील.
दिवसाच्या सुरुवातीला तुमची विचारसरणी खूप सकारात्मक असेल पण तुम्ही ती दिवसभर टिकवून ठेवू शकणार नाही. स्वभावाने थोडे उद्धट दिसतील. नोकरीत तुमचा एखाद्याशी वाद होऊ शकतो.
अंतर्गत कौटुंबिक बाबींमुळे तुम्ही खूप विचलित राहू शकता, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. जर तुम्ही घरातील वडिलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला घेऊन पैसे गुंतवले तर तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता निर्माण होईल.
तुम्ही तुमच्या सकारात्मक विचाराने सर्व कामे पूर्ण कराल आणि तुम्हाला उत्साही वाटेल. विनाकारण रागामुळे तुमचे काम बिघडेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी आज वैचारिक मतभेद होऊ शकतात.
संबंधित बातम्या