मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार आजचा दिवस या मूलांकासाठी फायदेशीर, जाणून घ्या अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार आजचा दिवस या मूलांकासाठी फायदेशीर, जाणून घ्या अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 12, 2024 10:28 AM IST

Ank Bhavishya 12 january 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल हे पाहता येते. तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल.

Numerology horoscope
Numerology horoscope

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १२ असेल तर तुमचा मूलांक १+२=३ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ३ चा स्वामी ग्रह गुरु आहे. शुक्रवार १२ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

कुटूंबासोबत चांगले संबंध असतील आणि रोमॅंटीक दिवस राहील. प्रयत्न करत राहा. प्रेमजीवन नरम गरम राहील. जोडीदारासोबत फिरण्याचे आयोजन कराल. संपत्ती संबंधी स्थिती चांगली राहील.

मूलांक २- 

मनात शांत भावना राहील. दिवस चांगला आहे, परंतू प्रेमजीवनात सकारात्मकता ठेवा. दिवस संतुलीत राहील. गुंतवणूकीचा विचार करू शकतात.

मूलांक ३- 

करिअरमध्ये वयक्तीक प्रगती राहील. व्यक्तिगत आणि व्यावसायीक विकासाच्या संधी मिळतील. आजचा सकारात्मक दिवस आशादायक राहील, त्यामुळे कार्यक्षेत्रात कामावर लक्ष द्या.

मूलांक ४- 

आरोग्य उत्तम राहील. आर्थिक आणि कुटूंबात प्रगतीच्या संधी आहेत. रोमॅंटीक संबंध राहतील, ज्यामुळे भावनात्मक जवळीक वाढेल. फिरायला जाण्याचे नियोजन कराल, तसेच संपंत्ती घेण्याचाही विचार राहील.

मूलांक ५ - 

आजचा दिवस चढ-उताराचा आहे. परंतू सायंकाळपर्यंत परिस्थिती चांगली होईल. आरोग्य आणि आर्थिक स्थिती फार चांगली राहील. तुम्हाला व्यावसायिक आणि कौटुंबिक परिस्थिती आव्हानात्मक राहील. तुम्ही संयम ठेऊन परिस्थितीवर मात कराल.

मूलांक ६- 

संपत्ती संबंधी चांगला दिवस आहे, परंतू संतूलन ठेवावे लागेल. ग्रहांची आजच्या दिवसावर खास कृपा राहील, यामुळे नात्यात आणि प्रेमजीवनात सकारात्मक प्रभाव दिसून येईल.

मूलांक ७ - 

प्रेमजीवनात अडचणींना सामोरे जावे लागेल. अडथळे निर्माण होतील ज्यामुळे नात्यात दुरावा येईल. गुंतवणूक करताना सांभाळून करा. फिरायला जात असाल तर काळजी घ्या. संपत्तीसंबंधी लक्ष द्या.

मूलांक ८- 

आव्हानांना सामोरे जातांना तुमच्या आर्थिक ताकदाचा वापर करा. वयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सांभाळून राहा. आजचा दिवस स्थिरता आणि संयमाचा राहील.

मूलांक ९- 

आरोग्य, आर्थिक आणि व्यावसायिक जीवनात चांगला काळ आहे. तुम्हाला सुरक्षीत वाटेल. कुटूंबात सकारात्मक वातावरण राहील.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग