मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार आजचा सोमवारचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार आजचा सोमवारचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 12, 2024 11:57 AM IST

Ank Bhavishya 12 february 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

Numerology Horoscope
Numerology Horoscope

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १२ असेल तर तुमचा मूलांक १+२= ३ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ३ चा स्वामी ग्रह गुरु आहे. सोमवार १२ फेब्रुवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

आठवड्याचा पहिला दिवस चांगला जाईल. आर्थिक लाभाची विशेष शक्यता आहे आणि तुम्ही मित्रासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायात प्रगती होताना दिसते. समाजात तुमचे नाव आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार लोकांना एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

मूलांक २- 

धीर धरा आणि कोणत्याही प्रकारचे कठोर शब्द वापरू नका. आर्थिकबाबत काही समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही इकडे तिकडे पळाल. व्यावसायिकांनी आज सावधगिरीने काम करावे, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.

मूलांक ३- 

आज तुम्ही लोकांना कोणत्याही प्रकारचे सल्ले देणे टाळावे, अन्यथा शेवटी तुम्ही चुकीचे सिद्ध होऊ शकता. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज खूप मेहनत करावी लागू शकते. नोकरीतील लोकांना आज जोडीदारामुळे अडचणी येऊ शकतात. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील.

मूलांक ४- 

दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. अचानक दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे घाई टाळा आणि काळजीपूर्वक वाहन चालवा. आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा अन्यथा नुकसान होऊ शकते. आज तुम्हाला काही विशेष निर्णय घ्यायचा असेल तर तो पुढे ढकला.

मूलांक ५- 

भाग्य आज तुम्हाला साथ देईल. तुम्ही जे काही विचार केला असेल ते आज पूर्ण होईल. अडकलेले पैसे अचानक तुम्हाला मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवाल. नोकरदार लोकांना आणि व्यावसायिकांना आज चांगले आर्थिक लाभ मिळतील आणि कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. जोडीदारासोबत फिरायला जाल.

मूलांक ६-

नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील, ज्यामुळे तुम्हाला चांगली बढती मिळेल. व्यावसायिकांना आज चांगले आर्थिक लाभ मिळतील आणि त्यांच्या व्यवसायात प्रगती होईल. कोणत्याही गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल.

मूलांक ७- 

कामात काही अडथळे येतील, त्यामुळे तुम्ही नाराज होऊ शकता. आज वाहन जपून चालवा अन्यथा जखमी होण्याची शक्यता आहे. तुमचा येणारा पैसा अचानक कुठेतरी अडकू शकतो. जोडीदारासोबत एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो, त्यामुळे संयम ठेवा.

मूलांक ८- 

आज घरात एखादा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी होतील. वडिलांच्या मदतीने तुम्ही नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करू शकता. नोकरदार लोक आज पैसे कमवण्याचे इतर मार्ग शोधतील. व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल.

मूलांक ९- 

दिवस चांगला जाईल. तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल, ज्यामुळे तुम्ही अपूर्ण कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. आज तुम्ही अशा शुभ कार्याबद्दल विचार करू शकता जे तुम्हाला खूप दिवसांपासून करायचे होते. दिवसभर घरात आनंदाचे वातावरण राहील आणि विशेष पाहुणे येण्याची शक्यता आहे. तसेच आज प्रेम जोडीदाराकडून काही खास भेट मिळू शकते.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग