तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ११ असेल तर तुमचा मूलांक १+१=२ आहे. अंकशास्त्रात, मूलांक २ चा स्वामी ग्रह चंद्र आहे. सोमवार ११ मार्च २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला नाही, त्यामुळे आज कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. वाढत्या समस्यांमुळे काहींना आज चिंता वाटेल. आज तुमची प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.
कौटुंबिक दृष्टिकोनातून आजचा दिवस सामान्य असेल. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची तब्येत अचानक बिघडू शकते, त्यामुळे आज कुटुंबात तणावाचे वातावरण असेल.
तुमची सर्व नियोजित कामे आज पूर्ण होतील. आज तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबातील सर्वजण तुमच्या समजूतदारपणाची प्रशंसा करतील आणि प्रत्येकजण तुमच्याकडून सल्ला घेऊनच त्यांचे काम करेल. प्रलंबित पैसे अचानक उपलब्ध होतील.
तुमच्या पालकांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि त्यांच्या मदतीने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत होईल. तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर आजचा दिवस लाभदायक असेल. पदप्राप्तीचे योग आहेत.
आज कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, तुमचे आरोग्यही खराब राहू शकते. कुटुंबासोबत आजचा दिवस सामान्य असेल, कुटुंबातील सदस्यांशी सौहार्दपूर्ण संबंध राखून तुम्हाला फायदा होईल.
आज तुम्हाला उत्साही वाटेल. तुम्ही स्वतःसाठी काही आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी अनावश्यक पैसे खर्च करू शकता. मित्रांसोबत तुमचा दिवस चांगला जाईल आणि काही महत्वाची माहिती देखील मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत काही मतभेद चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील.
आज विचार करूनच व्यवसायात पैसे गुंतवा. डोकेदुखीच्या तक्रारी तुम्हाला दिवसभर त्रास देऊ शकतात. नोकरदारांना अधिकाऱ्यांमुळे कामात अडचणी येऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला जाईल.
जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. आईमुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. कुटुंबातील विवाहित व्यक्तीसाठी चांगले संबंध येऊ शकतात. नवविवाहितांना आज त्यांच्या घरी काही चांगली बातमी मिळू शकते.
आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. आज तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. तब्येतीची काळजी घ्या नाहीतर चिंतेत राहाल.