तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ११ असेल तर तुमचा मूलांक १+१=२ आहे. अंकशास्त्रात, मूलांक २ चा स्वामी ग्रह चंद्र आहे. गुरुवार ११ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
चढ-उताराचा दिवस राहील. कुटूंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदार आणि आई-वडीलांसोबत मौजमजा कराल. आर्थिक स्थिती, गुंतवणूकसाठी चढ-उताराचा दिवस आहे.
आर्थिक स्थिती आणि आरोग्य चिंतादायक आहे. वयक्तीक आणि व्यावसायीक जीवनात आव्हान असेल तर संयम आणि नियोजन करून सामोरे जा. काळजी घ्या.
प्रेमजीवनात थोडा ताण-तणाव असेल, कोणीतरी तुमच्या प्रेम जीवनाला ठेच पोहचवतंय. बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन आणि संपत्ती संबंधी व्यवहारांवर लक्ष द्या. तुमची संपत्ती आणि विविध बाबतीत सकारात्मकता राहील.
आरामाचा दिवस आहे. आव्हान तर जीवनात येतच राहतात, पण तुम्ही हुशारीने सामोरे जातात. आर्थिक परिस्थिती ओळखा आणि त्यानुसार व्यवहार करा.
गुंतवणूक करण्याआधी चौफेर विचार करा. आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात, काळजी घ्यावी. कार्यक्षेत्रातील मोठे वाद ताण वाढवतील. घरातील परिस्थिती सुधारण्याची गरज भासेल.
तुमच्यातील कलागुणांना समोर आणण्याची योग्य वेळ आहे. घरातील प्रकरण योग्य पद्धतीने हाताळणे महत्वाचे आहे. प्रेमजीवन चांगले जाईल.
सुदृढ आरोग्य तुम्हाला उत्साहित ठेऊ शकते. आर्थिक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवा. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कुटूंबातील सदस्यांसोबत चांगले व्यवहार करा. लाबंचा प्रवास घडेल. जमीन मालमत्ता घेण्यासाठी तुम्ही सक्रीय असाल.
नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास करू शकतात. संपत्तीशी संबंध नसेल अशा कोणत्याही गोष्टीपासून लांभ राहा. शैक्षणिक बाबतीत मोठे काम लाभदायक ठरू शकते.
गुंतवणूकीसाठी चांगल्या संधी निवडा. मालमत्ता संबंधी प्रकरण मार्गी लागेल, संपत्ती वाढवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. शैक्षणिक क्षेत्रात प्रयत्नांना यश लाभेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)