तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १० असेल तर तुमचा मूलांक १ आहे. अंकशास्त्रात, मूलांक १ चा स्वामी ग्रह सूर्य आहे. बुधवार १० जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
आर्थिक स्थितीवर लक्ष द्या. खर्चावर ताबा ठेवा, व्यर्थ खर्च टाळा. खाण्या-पिण्याची पथ्य पाळा. कार्यक्षेत्रात जास्त कामाचा बोजा राहू शकतो. घरातील बदल तुम्हाला हवा तसा नसेल.
फिरायला जाण्याचे नियोजन करत असाल तर विचारपूर्वक करा. शैक्षणिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. एखादा आर्थिक सौदा तुम्हाला यशाचा ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.
कार्यक्षेत्रात नावलौकीक मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांसोबत आनंदात वेळ घालवाल. काहींना परदेश दौऱ्याच्या संधी उपलब्ध होतील.
संपत्ती संबंधी प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती कराल आणि मान-सन्मान मिळवाल. एखाद्या चांगल्या व्यक्तिसोबत संभाषण घडेल.
गुंतवणूकीसाठी चांगल्या संधी निवडा. मालमत्ता संबंधी प्रकरण मार्गी लागेल, संपत्ती वाढवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. शैक्षणिक क्षेत्रात प्रयत्नांना यश लाभेल.
तुमच्यातील कलागुणांना समोर आणण्याची योग्य वेळ आहे. घरातील प्रकरण योग्य पद्धतीने हाताळणे महत्वाचे आहे. प्रेमजीवन चांगले जाईल.
गुंतवणूक करण्याआधी चौफेर विचार करा. आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात, काळजी घ्यावी. कार्यक्षेत्रातील मोठे वाद ताण वाढवतील. घरातील परिस्थिती सुधारण्याची गरज भासेल.
नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास करू शकतात. संपत्तीशी संबंध नसेल अशा कोणत्याही गोष्टीपासून लांभ राहा. शैक्षणिक बाबतीत मोठे काम लाभदायक ठरू शकते.
सुदृढ आरोग्य तुम्हाला उत्साहित ठेऊ शकते. आर्थिक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवा. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कुटूंबातील सदस्यांसोबत चांगले व्यवहार करा. लाबंचा प्रवास घडेल. जमीन मालमत्ता घेण्यासाठी तुम्ही सक्रीय असाल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)