मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन तुमच्यासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन तुमच्यासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 10, 2024 11:52 AM IST

Ank Bhavishya 10 april 2024 : अंकशास्त्राच्या गणनेनुसार श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

अंकभविष्य
अंकभविष्य

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुयम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १० असेल तर तुमचा मूलांक १+०=१ आहे. अंकशास्त्रात, मूलांक १ चा स्वामी ग्रह सूर्य आहे. बुधवार १० एप्रिल २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन या सर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

अचानक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या बोलण्याच्या पद्धतीत विनम्र व्हाल, ज्यामुळे तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यावर प्रभावित होतील. गरजेनुसार जास्तीत जास्त खर्च करा.

मूलांक २- 

आज तुम्हाला खास जिव्हाळा मिळेल. तुमच्या आईचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणतील. एखाद्या गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम राहील.

मूलांक ३- 

आज तुम्ही कोणताही विशेष व्यवहार टाळावा. तुमचे माहितीपूर्ण शब्द सर्वांना आकर्षक वाटतील. तुमच्या सल्ल्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा सल्ला एखाद्याला आवश्यक असेल तरच द्या.

मूलांक ४- 

आज तुम्ही कोणतेही काम करत असाल तर त्याची नीट चाचपणी करूनच करा, अन्यथा तुम्ही आर्थिक अडचणीत अडकू शकता. तुमच्या आईची तब्येतही आज तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनेल.

मूलांक ५- 

आज तुमची बुद्धिमत्ता आश्चर्यकारक काम करेल, ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसाल. पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे, त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही काही प्रभावी पद्धतींचा विचार करू शकता. आज तुम्ही तुमच्या कामात काही नवीन मार्ग देखील जोडू शकाल.

मूलांक ६- 

जोडीदाराशी प्रेमाने वागावे. आज तुम्ही तुमच्या तब्येतीची पूर्ण काळजी घ्यावी, अन्यथा छातीशी संबंधित समस्यांमुळे तुम्ही दिवसभर त्रस्त व्हाल.आज केलेल्या कार्याची सुरवात चांगले फळ देऊ शकते.

मूलांक ७- 

आर्थिक समस्यांमुळे तुम्ही दिवसभर चिंतेत राहू शकता. तुमच्या चालू असलेल्या कामात अडथळे येतील. वादात अडकलात. आज तुमची आई आणि तुमची पत्नी यांच्यात वाद वाढू शकतात.

मूलांक ८- 

तुम्हाला खूप निराशेचा सामना करावा लागेल. आज तुम्हाला भौतिक आणि आर्थिक सुखात अडचण जाणवेल. मानसिक तणाव जाणवेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामातील सर्व उणीवा त्यांना सापडतील, तुम्ही विनाकारण अडचणीत अडकू शकता.

मूलांक ९- 

आज तुमच्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आज, पैशाचे व्यवस्थापन नेहमीपेक्षा बरेच चांगले होईल. आज तुम्ही तुमच्या भावांशी काही जमीन आणि मालमत्तेबाबत चर्चा करू शकता. आज कोणतेही काम घाईत करू नका अन्यथा पैसे कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel

विभाग