मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार नववर्षाचा पहिला दिवस कसा जाईल, जाणून घ्या अंक भविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार नववर्षाचा पहिला दिवस कसा जाईल, जाणून घ्या अंक भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 01, 2024 10:55 AM IST

Ank Bhavishya 1 january 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल हे पाहता येते. तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या नववर्षाचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा जाईल.

Ank jyotish 1 january 2024
Ank jyotish 1 january 2024

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १ असेल तर तुमचा मूलांक १ आहे. अंकशास्त्रात, मूलांक १ चा स्वामी ग्रह सूर्य आहे. सोमवार १ जानेवारीचा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

नवीन वर्ष नवीन बदलांचे ठरेल त्यासाठी तयार राहा. वयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटूंबात एखादे मंगलकार्याचे आयोजन होईल. कामकाजात यश मिळेल. नवीन नोकरीची संधी मिळेल. जीवनशैली आधीपेक्षा चांगली होईल. आरोग्याची काळजी घ्या. कामाचे जास्ट टेंशन करून घेऊ नका.

मूलांक २- 

आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मोठे आर्थिक निर्णय घ्यावे लागतील. विचारपूर्वक गुंतवणूक करा. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभ बातमी मिळेल वैवाहिक जीवनात आनंदी आनंद राहील. प्रेम संबंधात सुधारणा होईल. आईकडून आर्थिक लाभ होईल. आरोग्य सुदृढ राहील.

मूलांक ३- 

आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आत्मविश्वास भरपूर राहील आणि ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक असाल. नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. कुटूंबात प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण राहील. पदोन्नती व मान-सन्मानाचा शुभ योग आहे.

मूलांक ४- 

कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. भाऊ-बहिणीच्या नात्यात सुधारणा होईल. कुटूंबासोबत वाद-विवाद टाळा. अतिखर्चामुळे चिंतीत असाल. गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. कामकाजाचे दडपण करून घेऊ नका. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. मेडिटेशन आणि योगा करा.

मूलांक ५ - 

नववर्षाचा पहिला दिवस भाग्याचा ठरेल. मागील गुंतवणूकीतून धनलाभ होईल. आर्थिक वृद्धी होईल. कार्यातील आव्हान दूर होईल. कार्यक्षेत्रात पदोन्नती किंवा पगारवाढीच्या संधी मिळतील. आर्थिक बचत करा. भागीदारीतील व्यावसायिकांना अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.

मूलांक ६- 

मूलांक ६- नात्यात भावनिक व्हाल. शब्दांवर ताबा ठेवा नाहीतर जोडीदाराचे मन हताश होऊ शकते. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. वयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल ठेवावा. सर्व कामे चांगले होईल.

मूलांक ७ - 

आनंदाचे वातावरण राहील. नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. नवीन व्यवसायाची सुरवात होईल. आर्थिक वृद्धीच्या नव्या संधी मिळतील. व्यवसायात कोणावरही डोळे बंद ठेऊन विश्वास करू नका. घरातील शुभ कार्यावर आर्थिक खर्च होईल. कुटूंबात सुख-शांती राहील.

मूलांक ८- 

मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. समाजकार्यात सहभाग घ्याल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश येईल. व्यावसायित जीवनात शुभवार्ता मिळेल. आत्मविश्वासाने प्रगतीच्या मार्गावर चारत राहा. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आर्थिक नियोजन करा आणि करिअरमध्ये ध्येयावर लक्ष केंद्रित करा.

मूलांक ९- 

कार्यक्षेत्रातील व्यर्थ वाद-विवाद टाळा. कामकाजाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळा. कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. जास्त खर्चामुळे मन चिंतीत होईल. लग्नासंबंधी चर्चा होईल. नवीन बदलासोबत नवीन वर्षाची सुरवात होईल. खाण्या-पिण्याची पथ्य पाळा.

विभाग