तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १ असेल तर तुमचा मूलांक १ आहे. अंकशास्त्रात, मूलांक १ चा स्वामी ग्रह सूर्य आहे. गुरुवार १ फेब्रुवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
आज कोणत्याही बाबतीत गुंतवणूक करताना तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर असणे गरजेचे आहे. दररोज नियमीत व्यायाम करा. आज मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस आहे. कुटुंबात मंगलकार्य होईल आणि तुमचा दिवस व्यस्त राहील.
आर्थिक बाबतीत परिस्थिती मजबूत आहे, कारण तुमची बचत चांगली आहे. आरोग्य सुदृढ आहे आणि याचा तुम्हाला फायदा होईल. व्यावसायिक जीवनात बदल होतील, परंतू या बदलाचा लाभ नंतर होईल.
कुटुंबातील एखाद्या कार्यक्रमात तुमची प्रशंसा व कौतुक होईल. वडिलोपार्जीत मालमत्ता मिळण्याचे संकेत आहे. कार्यक्षेत्रात आपल्या टार्गेटवर लक्ष द्या, पदोन्नतीच्या वेळी कामी येईल. आरोग्य सुदृढ राहील
आज चांगली गुंतवणूक कराल, तुमच्यासाठी चांगला दिवस आहे, चांगला परतावा मिळेल. पण तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. घरात मंगलकार्य होतील. कार्यक्षेत्रात पदोन्नतीचे योग आहेत.
फेब्रुवारीचा पहिला दिवस खूप चांगला आहे. लवकरच तुम्ही संपत्तीचे मालक असाल, चांगला लाभ होईल. प्रेमजीवनात थोडे लक्ष द्यावे लागेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा आणि मौज मजा करण्याचा प्रयत्न करा.
खूपच चांगला दिवस आहे. व्यावसायित बाबतीत चांगलं सिद्ध कराल. तुमची प्रतिमा चांगली तयार झाली आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात तुमच्यासाठी व्यस्त दिवस राहील. गुंतवणूकीसाठी वाट पाहा.
व्यर्थ खर्च टाळा. जास्त खर्च तुमचे बजेट खराब करेल. तुम्हाला सुट्टी घेऊन फिरायला जाण्याची गरज आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तिमुळे मान ताठ होईल. कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील.
आनंदी आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला पुन्हा जुन्या गोष्टींजवळ माघारी फिरावे लागेल. प्रेमजीवनासाठी सुखद वातावरण राहील. मालमत्ता संबंधी निर्णय पुढे ढकल्यास चांगले होईल.
फेब्रुवारी महिन्याचा पहिलाच दिवस तुमच्यासाठी खास आहे. आरोग्यावर लक्ष द्यावे. नियमीत व्यायाम करावा. व्यवसायात तुम्ही तुमच्या जोडीदाराला पाठींबा द्यायला हवा. कुटुंबातील सदस्यही आर्थिक मदत मागू शकतात.