जोतिष शास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रसुद्धा तितकेच महत्वाचे आहे. अनेक लोकांना अंकभविष्य पाहून दिवसाची सुरुवात करण्याची सवय असते. आपल्यासाठी आजचा लकी नंबर कोणता आणि लकी रंग कोणता याकडे लोकांचे लक्ष असते. अंकभविष्यात याबाबत माहिती दिली जाते.
जोतिष अभ्यासात ज्यानुसार राशींवरुन भविष्य सांगितले जाते. तसेच अंकभविष्यात मूलांकावरुन भविष्यचा अंदाज बांधला जातो. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल हे मूलांकाच्या आधारे जाणून घेऊया.
आजचा दिवस मूलांक १ च्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनप्राप्ती होईल. भूतकाळात केलेल्या आर्थिक गुंतवणूकीतून आता फायदा मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे. घरातील वातावरण आनंदी असेल. नवीन काम सुरु करण्यासाठी दिवस उत्तम आहे. (कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९, २८, तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो )
शुभ अंक-३
शुभ रंग-हिरवा
मूलांक २ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला उत्साही वाटेल. आर्थिक बाबतीतसुद्धा स्थैर्य राहणार आहे. स्वभाव आज अतिशय हळवा राहील. आज तुम्हाला मनावर ताबा ठेवण्याचा सल्ला शास्त्रानुसार देण्यात आला आहे. अथवा मन दुखावण्याची शक्यता आहे. (कोणत्याही महिन्याच्या २,११,२०,२९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असेल)
शुभ अंक-२२
शुभ रंग-पिवळा
मूलांक ३ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज प्रत्येक कार्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. आता केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचा फायदा भविष्यात होणार आहे. नोकरदार वर्गसाठीसुद्धा आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदारासोबत मनमोकळ्यापणाने संवाद होईल. (कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१,३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो)
शुभ अंक-१२
शुभ रंग-लाल
मूलांक चार असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. दिवसभर नकारात्मक विचार येत राहतील. पैशांसंबंधी अथवा कामासंबंधी तुमच्यात अहंकार निर्माण होईल. त्यामुळे जवळचे लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतील. आज आर्थिक गुंतवणूक करणे शक्यतो टाळा. रागावर नियंत्रण ठेवा अथवा मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. (कोणत्याही महिन्याचा ४, १३, २२, ३१ या तारखेला लोकांचा मूलांक ४ असतो)
शुभ अंक-८
शुभ रंग-निळा
आजचा दिवस मूलांक ५ असणाऱ्या लोकांसाठी चांगला आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या बौद्धिक क्षमतेचं कौतुक होईल. धन येण्याचे अनेक मार्ग खुले होतील. आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, एखादी जमीन खरेदी करणे फायदेशीर ठरेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. (कोणत्याही महिन्याचा ५,१४,२३ तारखेला जन्मलेल्या मूलांक ५ असतो.)
शुभ अंक-१६
शुभ रंग-भगवा
मूलांक ६ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज प्रत्येक गोष्टीत तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. आज आर्थिकदृष्ट्या दिनमान अनुकूल असेल. पैशांची चणचण भासणार नाही. एखादी महागडी शोभेची वस्तू खरेदी करु शकता. अनेक दिवसांपासून येत असलेल्या अडचणी आज दूर होतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. (कोणत्याही महिन्यात ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.)
शुभ अंक-६
शुभ रंग-चॉकलेटी
मूलांक ७ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज फारसा धनलाभ होणार नाही. याउलट आर्थिक गुंतवणूक नुकसानदायक ठरु शकते. व्यापार-उद्योगांना मात्र आजचा दिवस बरा आहे. कामाच्या व्यापामुळे कुटुंबासोबत वेळ घालवणे शक्य होणार नाही. त्यामुळे थोडेसे वाईट वाटेल. (कोणत्याही महिन्याचा ७,१६,२५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो.)
शुभ अंक-७
शुभ रंग- गुलाबी
मूलांक ८ च्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. आज आर्थिक दृष्टिकोनातून फारसा लाभ संभवत नाही. आज कोणताही महत्वाचा निर्णय घेणे टाळावे. आज नोकरी बदलण्याचा विचार मनातून काढून टाकावा अथवा निराशा पदरी पडेल. (कोणत्याही महिन्याच्या ८, १७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.)
शुभ अंक-४
शुभ रंग- पिवळा
मूलांक ९ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आर्थिक बाबतीत आजचा दिवस उत्तम आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे आज परत मिळतील. मात्र आज तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावा लागेल. अथवा हातात आलेल्या संधी निसटण्याची शक्यता आहे. सौम्य वाणी ठेऊन इतरांशी संवाद साधा. (कोणत्याही महिन्याच्या ९, १८,२७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)
शुभ अंक-६
शुभ रंग- पांढरा