Numerology Predictions Today : जोतिषशास्त्राप्रमाणेच अंक शास्त्रातसुद्धा तुमचा स्वभाव, काळ,वेळ यांचा अंदाज बांधला जातो. अंकशास्त्रात मूलांकावरुन भविष्य सांगितले जाते. तुमच्या जन्मतारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्याला मूलांक म्हटले जाते. आज हर्षल योगात आणि चंद्र संक्रमणात शनिवारचा दिवस कसा असणार हे मूलांकावरुन जाणून घेऊया.
मूलांक १ च्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अथवा रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन आजार बळावू शकतात. तुमच्यावर असलेलं कर्जाचं डोंगर लवकरच कमी होईल. ताणतणाव कमी होऊन कामात लक्ष लागेल. (कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९, २८, तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो )
शुभ अंक-१. शुभ रंग-लाल
मूलांक २ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. एखाद्या महत्वाच्या कामात आईवडिलांचा पाठिंबा लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमचा नावलौकिक वाढेल. आर्थिकदृष्ट्या दिवस सामान्य असेल. फारसा आर्थिक लाभ होणार नाही. मात्र मानसन्मान मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध खेळीमेळीचे राहतील. (कोणत्याही महिन्याच्या २,११,२०,२९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असेल)
शुभ अंक-३. शुभ रंग-चॉकलेटी
मूलांक ३ असणाऱ्या लोकांना आजचा दिवस फलदायी असणार आहे. तुमच्या बौद्धिक क्षमतेचं कौतुक होईल. सहकारी तुमचा सल्ला घेऊन काम करतील. मात्र घाईगडबडीत सल्ला देणे टाळा. अथवा त्याचे विपरीत परिणाम दिसून शकतात. तुमच्या मनात एखाद्या शासकीय संस्थेसोबत काम करण्याची इच्छा असेल तर ते स्वप्न आज पूर्ण होईल. (कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१,३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो)
शुभ अंक-१. शुभ रंग-राखाडी
मूलांक ४ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. एखाद्या प्रकरणात तुम्हाला शासकीय नोटीस मिळू शकते. वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या अथवा जुनी दुखणी पुन्हा पाठ धरू शकतात. दिवसभर आर्थिक चणचण भासेल.त्यामुळे मानसिक स्वास्थ्य ढासळू शकते. जोडीदारासोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. (कोणत्याही महिन्याचा ४, १३, २२, ३१ या तारखेला लोकांचा मूलांक ४ असतो)
शुभ अंक-८. शुभ रंग-भगवा
आजचा दिवस मूलांक ५ असणाऱ्या लोकांसाठी अतिशय अनुकूल आहे. अनेक दिवसांपासून मनात घोळत असलेल्या योजना आज प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळेल. नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करताना मात्र विशेष काळजी घ्या अथवा पैसे बुडू शकतात. बहीण किंवा मुलीच्या सल्ल्याने गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. (कोणत्याही महिन्याचा ५,१४,२३ तारखेला जन्मलेल्या मूलांक ५ असतो.)
शुभ अंक-१०. शुभ रंग-पिवळा
मूलांक ६ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कामाच्या ठिकाणी आज तुमचे इतरांशी मतभेद होऊ शकतात. त्यामुळे रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांसोबत बोलतानासुद्धा काळजीपूर्वक बोला. आईवडील, भाऊ बहिणीसोबत संबंध चांगले ठेवा. अथवा दुरावा वाढू शकतो. (कोणत्याही महिन्यात ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.)
शुभ अंक-२२. शुभ रंग-भगवा
आजचा दिवस मूलांक ७ असणाऱ्या लोकांसाठी काहीसा तणावात्मक असू शकतो. मिळकतीपेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त होऊ शकते. त्यामुळे चिडचिडपणा वाढेल. मात्र वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होणार आहे. त्यामुळे थोडासा दिलासा लाभेल. कुटुंबातील एखादा सदस्य तुम्हाला एखाद्या प्रकरणात जाब विचारु शकतो. (कोणत्याही महिन्याचा ७,१६,२५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो.)
शुभ अंक-१३. शुभ रंग-लाल
मूलांक ८ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अडचणींचा असणार आहे. आज तुम्हाला प्रत्येक कामात अडथळे जाणवतील. ताण येऊन मानसिक स्थिती बिघडू शकते. आज सूर्यदेवाला जल अर्पण करणे लाभदायक ठरेल. त्यामुळे तुमच्या तणावात काहीसा दिलासा मिळेल. (कोणत्याही महिन्याच्या ८, १७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.)
शुभ अंक-१२. शुभ रंग-पिवळा
मूलांक ९ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. अपेक्षित असलेली सर्व महत्वाची कामे आज पूर्ण होतील. आर्थिक बाबींमधील अडथळे आता दूर होतील. त्यामुळे मनःशांती लाभेल. (कोणत्याही महिन्याच्या ९, १८,२७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)
शुभ अंक-७. शुभ रंग-गुलाबी
संबंधित बातम्या