अंक जोतिषानुसार, आज मंगळवार १४ मे २०२४ रोजी लक्ष्मी नारायण योग जुळून आला आहे. हा योग अंकशास्त्रातील अनेक मूलांकावर शुभ प्रभाव टाकणार आहे. अंकशास्त्रात तुमच्या जन्म तारखेच्या बेरजेवरुन मूलांक ठरवला जातो. या मूलांकाच्या साहाय्याने तुमचे भविष्य सांगण्यास मदत होते. आजच्या दिवशी मूलांकानुसार तुमच्यासाठी कोणता अंक आणि कोणता रंग शुभ ठरणार याबाबत जाणून घेऊया.
मूलांक १ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज महत्वाच्या कामात वडिलांची पूर्ण साथ मिळणार आहे. व्यवसायात आज नवे प्रस्ताव हाती लागतील. त्यामुळे तुमचा सरकारी कामासोबत संपर्क येऊ शकतो. मात्र आज रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आज दिवसभर उत्साही राहाल. (कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९, २८, तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो )
शुभ अंक-२
शुभ रंग-पांढरा
मूलांक २ च्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायक असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमचा नावलौकिक वाढेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. दिवसभर प्रत्येक कामात आई वडिलांची साथ मिळणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध चांगले राहतील. त्यामुळे घरातील वातावरण खेळीमेळीचे असेल. (कोणत्याही महिन्याच्या २,११,२०,२९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असेल)
शुभ अंक-२२
शुभ रंग-हिरवा
मूलांक ३ च्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. आज तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या बौद्धिक क्षमतेचं कौतुक होईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. एखाद्या शैक्षणिक संस्थेसोबत काम असेल तर ते स्वप्न आज पूर्ण होईल. मात्र कोणालाही सल्ला देताना विचारपूर्वक द्या अथवा नातेसंबंध बिघडू शकतात. (कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१,३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो)
शुभ अंक-६
शुभ रंग- लाल
मूलांक ४ च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. एखाद्या गोष्टीत तुम्हाला शासकीय नोटीस मिळू शकते. वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. अथवा जुनी दुखणी त्रास देऊ शकतात. आर्थिक स्थितीसुद्धा बिघडू शकते. समाजात अपमानास्पद परिस्थिती उद्भवू शकते. आज जोडीदारासोबत चांगला संवाद फायद्याचा ठरु शकतो. (कोणत्याही महिन्याचा ४, १३, २२, ३१ या तारखेला लोकांचा मूलांक ४ असतो)
शुभ अंक-८
शुभ रंग-लाल
मूलांक ५ च्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल असणार आहे. अनेक दिवसांपासून विचारात असलेल्या योजना आज अंमलात आणाल. नवा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस शुभ आहे. कोणतीही गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या. गुंतवणूक करण्यापूर्वी बहीण किंवा मुलीचा सल्ला घेतल्यास लाभ होईल. (कोणत्याही महिन्याचा ५,१४,२३ तारखेला जन्मलेल्या मूलांक ५ असतो.)
शुभ अंक-७
शुभ रंग- आकाशी कलर
मूलांक ६ च्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी वादविवादांपासून दूर राहा. अथवा सहकाऱ्यांचा तुमच्याशी मतभेद होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. आणि कोणतीही गोष्ट विचारपूर्वक बोला. एखाद्या निर्णयात कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. (कोणत्याही महिन्यात ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.)
शुभ अंक-९
शुभ रंग-लाल
मूलांक ७ च्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अडचणी आज संपुष्ठात येतील. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अथवा आरोग्यासंबंधित मोठ्या समस्या उद्भवू शकतात. आर्थिकबाबतीत सांगायचे तर, आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टीसाठी कुटुंबातील सदस्य तुम्हाला जबाबदार ठरवू शकतात. त्यामुळे कोणतेही कार्य करताना त्यांचा सल्ला अवश्य घ्या. (कोणत्याही महिन्याचा ७,१६,२५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो.)
शुभ अंक-३
शुभ रंग-पिवळा
मूलांक ८ च्या लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरु शकतो. हातात घेतलेल्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी सूर्याला नमस्कार करुन जल अर्पण केल्यास फायदा होऊ शकतो. मानसिक दृष्ट्या तुम्ही स्थिर असाल. आज रागावर ताबा ठेऊन इतरांशी संवाद साधा. अथवा जवळच्या व्यक्तींशी खटके उडण्याची शक्यता आहे.
(कोणत्याही महिन्याच्या ८, १७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.)
शुभ अंक-९
शुभ रंग-पांढरा
मूलांक ९ च्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज प्रत्येक कार्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. डोक्यात असलेल्या कल्पना सत्यात उतरवण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्यसुद्धा उत्तम राहील. आज एखादे नवे कार्य सुरु करू शकता. कुटुंबातील सदस्यांची उत्तम साथ लाभेल. (कोणत्याही महिन्याच्या ९, १८,२७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)
शुभ अंक-७
शुभ रंग-निळा
संबंधित बातम्या