Numerology predictions for 12 may 2024 : आज रविवार १२ मे २०२४ रोजी शनीदेव आपल्या मुख्य त्रिकोण राशी असणाऱ्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनिदेव कुंभ राशीत विराजमान असल्याने शशी राजयोगाची निर्मिती होत आहे. तसेच बुधादित्य राजयोगाची निर्मिती होत आहे. अंकशास्त्रानुसार हा राजयोग अनेक मूलांकांसाठी शुभ परिणामांची निर्मिती करत आहे. आज कोणत्या मूलांकांसाठी दिवस कसा असणार? आणि कोणता अंक तुमच्यासाठी लकी असणार याबाबत जाणून घेऊया.
मूलांक १ साठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज आर्थिकदृष्ट्या तुमची स्थिती उत्तम असेल.अचानक धनलाभ झाल्याने तुमचे मन प्रसन्न होणार आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडासा तणावात्मक राहील. त्यामुळे कोणत्याही कामात आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे. (कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९, २८, तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो)
शुभ अंक-१२. शुभ रंग-हिरवा
आज मूलांक २ साठी दिवस अतिशय शुभ असणार आहे. आज तुमच्यावर पैशांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. भूतकाळात केलेल्या एखाद्या गुंतवणुकीचा आज दुप्पट फायदा मिळणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना बनवू शकता. घरातील वातावरण उत्साही राहील. (कोणत्याही महिन्याच्या २,११,२०,२९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असेल)
शुभ अंक - ४. शुभ रंग-हिरवा
मूलांक ३ च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे.विविध गोष्टींमुळे आज मानसिक तणाव येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. (कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१,३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो)
शुभ अंक - ६. शुभ रंग-भगवा
मूलांक ४ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. आज तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ लाभणार आहे. व्यावसायिकांना आज धनलाभ होऊ शकतो. कामानिमित्त परदेशवारी घडून येईल. (कोणत्याही महिन्याचा ४, १३, २२, ३१ या तारखेला लोकांचा मूलांक ४ असतो)
शुभ अंक - २. शुभ रंग- पांढरा
मूलांक ५ च्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असणार आहे. उद्योग-व्यापाराच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल असणार आहे. नोकरदारवर्गाला आज कामात विशेष लक्ष द्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. (कोणत्याही महिन्याचा ५,१४,२३ तारखेला जन्मलेल्या मूलांक ५ असतो.)
मूलांक ६ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. एखाद्या गोष्टीतून अचानक धनलाभ होईल. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही चौकस बुद्धीने कामे पूर्ण कराल. त्यामुळे वरिष्ठ तुमच्या पगारवाढीबाबत निर्णय घेऊ शकतात. आज कुटुंबासोबत मनोरंजक गोष्टी करण्याकडे तुमचा कल राहील. (कोणत्याही महिन्यात ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.)
शुभ अंक - ८. शुभ रंग-गुलाबी
मूलांक ७ च्या लोकांसाठी आज दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमचा स्वभाव कलात्मक आणि रचनात्मक असणार आहे. तुमच्यातील सुप्त कलागुणांना वाव द्याल. व्यवसायात वृद्धी होईल. कुटुंबियांसोबत दिवस खेळीमेळीचा जाईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. (कोणत्याही महिन्याचा ७,१६,२५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो.)
शुभ अंक - १४. शुभ रंग-निळा
मूलांक ८ साठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करणे टाळावे. आर्थिकदृष्ट्या आज मध्यम धनलाभ होईल. नोकरीमध्ये कंपनी बदलण्यास इच्छुक असणाऱ्यांना लोकांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. कुटुंबासोबत आज धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. (कोणत्याही महिन्याच्या ८, १७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.)
शुभ अंक- ३. शुभ रंग-हिरवा
मूलांक ९ च्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज दिवसभर तुम्हाला उत्साह जाणवेल. हातामध्ये पैसा राहील. त्यामुळे मनसुद्धा प्रसन्न असेल. व्यावसायिकांना आज व्यवसायात मिळकतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. कामाच्या दृष्टीने नवनव्या कल्पना डोक्यात येत राहतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.
(कोणत्याही महिन्याच्या ९, १८,२७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)
शुभ अंक - ७. शुभ रंग-पिवळा.
संबंधित बातम्या