आज शनिवार ११ मे २०२४ चा दिवस अंकशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा महत्वाचा असणार आहे. आज विनायक चतुर्थीच्या दिवशी काही मूलांकावर श्रीगणेशासोबतच शनीदेवाची विशेष कृपा राहणार आहे. तसेच बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योगसुद्धा जुळून आला आहे. आज या सर्व बदलांचा कोणत्या मूलांकावर कसा परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मूलांक १ च्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस अनुकूल असेल. पैशाची चणचण संपुष्ठात येईल. तुमच्या चौकस बुद्धीने कामातील त्रुटी दूर करण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे नावलौकीक वाढून मानसन्मान मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे असेल. (कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९, २८, तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो )
शुभ अंक-७
शुभ रंग-लाल
मूलांक २ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असेल. आज अचानक धनप्राप्ती होईल. व्यावसायिकांनी गुंतवणूक करताना आपल्या बहिणीचा किंवा मुलीचा सल्ला घेणे फलदायी ठरेल. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात आज यश मिळेल. व्यवसायात नव्या कल्पना सुचतील. (कोणत्याही महिन्याच्या २,११,२०,२९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असेल)
शुभ अंक-४
शुभ रंग-पिवळा
मूलांक ३ च्या लोकांसाठीसुद्धा आजचा दिवस शुभ आहे. आज अनपेक्षित गोष्टींमधून धनलाभ होईल. हातात अचानक पैसे आल्याने मन उत्साही होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मुलीला एखादी भेटवस्तू दिल्यास तुमच्याबाबत घरात आदर दुप्पट होऊन प्रेम वाढेल. (कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१,३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो)
शुभ अंक-७
शुभ रंग-भगवा
मूलांक ४ साठी आजचा दिवस अडचणींचा असणार आहे. हातात आलेल्या संधी पुन्हा निसटतील. त्यामुळे तणाव वाढेल. मनात नकारात्मक विचार येतील. वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांना आरोग्यासंबंधी समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे. (कोणत्याही महिन्याचा ४, १३, २२, ३१ या तारखेला लोकांचा मूलांक ४ असतो)
शुभ अंक-८
शुभ रंग-पिवळा
मूलांक ५ च्या लोकांवर आज शनिदेवाची उत्तम कृपा राहणार आहे. तुम्ही मनात योजिलेले सर्व कार्य आज पूर्णत्वास जातील. व्यवसायिकांना आर्थिक लाभ होईल. एखादा नवा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. घरातील सदस्यांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. (कोणत्याही महिन्याचा ५,१४,२३ तारखेला जन्मलेल्या मूलांक ५ असतो.)
शुभ अंक-१०
शुभ रंग-हिरवा
मूलांक ६ च्या लोंकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आर्थिकदृष्ट्यासुद्धा आजचा दिवस सामान्यच असेल. फारसा धनलाभ दिसून येणार नाही. पैशाच्या कमतरतेमुळे कुटुंबियांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. त्यामुळे आज तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शिवाय बोलताना विचारपूर्वक बोलावे लागेल. जोडीदारासोबत मात्र नातेसंबंध अधिक दृढ होतील. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. (कोणत्याही महिन्यात ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.)
शुभ अंक-३
शुभ रंग- गुलाबी
मूलांक ७ साठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असणार आहे. कोणत्याही ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या. त्या-त्या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेतल्यास लाभदायक ठरेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. अथवा पायांसंबंधी दुखणी त्रास देऊ शकतात. (कोणत्याही महिन्याचा ७,१६,२५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो.)
शुभ अंक-१४
शुभ रंग-पांढरा
मूलांक ८ च्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी असणार आहे. आजच्या दिवशी विनाकारण धावपळ करावी लागेल. पैशांची चणचण भासेल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा लाभदायक नाही. कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. (कोणत्याही महिन्याच्या ८, १७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.)
शुभ अंक-४
शुभ रंग-भगवा
मूलांक ९ च्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. आज पैशांची कमतरता भासणार नाही. अनपेक्षित मार्गाने धनलाभ होईल. मनासारख्या गोष्टी घडत असलयाने मन प्रसन्न राहील. (कोणत्याही महिन्याच्या ९, १८,२७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)
शुभ अंक-७
शुभ रंग-निळा