मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Zodiacs : आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत या राशीच्या व्यक्ती, जोडीदाराला करतात दु:खी
जोडीदाराशी भांडणाऱ्या राशी
जोडीदाराशी भांडणाऱ्या राशी (हिंदुस्तान टाइम्स)

Zodiacs : आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत या राशीच्या व्यक्ती, जोडीदाराला करतात दु:खी

28 March 2023, 15:42 ISTDilip Ramchandra Vaze

Angry Zodiac Signs : आपल्या जोडीदाराशी ताळमेळ राखणं अत्यंत गरजेचं असतं. परंतू काही राशीच्या व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

काही लोकं आपल्या भावना उघडपणे व्यक्त करतात. अनेकदा अशी लोकं आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि आपलं मानसिक संतुलन गमावून बसतात. असे लोक रागामुळे नात्यात कटूता आणतात. आपल्या जोडीदाराशी ताळमेळ राखणं अत्यंत गरजेचं असतं. परंतू काही राशीच्या व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. परिणामी ते आपल्या जोडीदाराला दु:खी करतात.

ट्रेंडिंग न्यूज

मेष

अग्नी राशीमुळे या राशीचे लोकं खूप निष्काळजी असतात. त्यांना राग लवकर येतो आणि त्या परिणाम त्यांच्या नातेसंबंधांवर होतो.

वृषभ

अत्यंत हट्टी रास म्हणून वृषभ कडे पाहिलं जातं. या राशीच्या व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. ते आपल्या जोडीदारावर आपला राग काढतात, मात्र त्यांना हे माहित असतं की आपला पार्टनर आपल्याला समजून घेईल. अनेकदा तसं होत नाही.

मिथुन

रागावर अजिबात नियंत्रण ठेवता येत नसलेली रास. आपल्या जोडीदाराला सर्वात जास्त त्रास देणारी रासा म्हणून मिथुनकडे पाहिलं जातं.

कर्क

अत्यंत दयाळू रास म्हणून ही रास प्रसिद्ध असली तरीही मोक्याच्या क्षणी ते आपलं नियंत्रण हरवतात आणि वाद घालतात.

कन्या

कामात परिपूर्णता ही या राशीची खासियत. त्यांना कामात निष्काळजीपणा आवडत नाही. आपल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास मात्र या राशीच्या व्यक्ती प्रचंड रागावतात.

वृश्चिक

इच्छेनुसार गोष्टी न मिळाल्यास यांच्या संतापाचा उद्रेक होतो. आपल्या जोडीदाराला त्याचा त्रास या व्यक्ती देतात. रागाच्या भरात आपल्या जोडीदाराशी संबंध संपवण्यासही या व्यक्ती मागेपुढे पाहात नाहीत.

या राशीच्या व्यक्तींना रागावर नियंत्रण कसं मिळवायचं ते माहिती असतं

कर्क, तूळ,धनु,मकर,कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करताना समोरच्याची खूप काळजी घेतात. आपला राग कसा नियंत्रित करायचा हे त्यांना माहित असतं. या व्यक्ती सहजासहजी आपला तोल गमावत नाहीत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग