मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Amavasya Dosh: अमावस्येला या ३ राशींनी सांभाळून राहा , जाणून घ्या अमावस्या दोष व त्यावर उपाय

Amavasya Dosh: अमावस्येला या ३ राशींनी सांभाळून राहा , जाणून घ्या अमावस्या दोष व त्यावर उपाय

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 10, 2024 03:02 PM IST

Amavasya Dosh: नववर्षाची पहिली अमावस्या तिथी गुरुवार ११ जानेवारी रोजी आहे. अमावस्या तिथीला काही लोकं अशुभ मानतात. अशात काही राशींना अमावस्या दोषाला सामोरे जावे लागेल. जाणून घ्या अमावस्या दोष म्हणजे काय व त्यावर उपाय.

What is Amavasya Dosh
What is Amavasya Dosh

वर्ष २०२४ ची पहिली अमावस्या तिथी १० जानेवारी रोजी रात्री ८ वाजून ११ मिनिटांनी प्रारंभ होईल आणि ११ जानेवारी रोजी ५ वाजून २७ मिनिटांनी समाप्त होईल. अशात उदयातिथीनुसार ११ जानेवारी रोजी अमावस्या तिथी वैध मानली जाईल. अमावस्या तिथीसंबंधी वेगवेगळ्या मान्यता आहे. परंतू, या अमावस्येला काही राशींना अमावस्या दोषाला सामोरे जावे लागेल. जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत, अमावस्या दोष म्हणजे काय व अमावस्या दोष असल्यास कोणते ज्योतिष उपाय करावे.

अमावस्या दोष म्हणजे काय

सूर्य व चंद्र यांची युती होते तेव्हा अमावस्या दोष निर्माण होतो. असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी सूर्याच्या प्रभावामुळे चंद्र आपली शक्ती गमावतो. सूर्य आणि चंद्र जेव्हा कुंडलीत किंवा जन्म तक्त्यामध्ये एकत्र होतात तेव्हा सूर्यचंद्र दोष तयार होतो. हे जीवनात आक्रमकता आणि सर्व प्रकारच्या दुर्दैवांना जन्म देते.

अमावास्येला सुर्य आणि चंद्र जवळ जवळ एका रेषेत असतात त्यामुळे पृथ्वीवर त्यातिथीला सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. याचा काही मानसिक विकारांशी संबंध असु शकतो.

वृषभ राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. इलेक्ट्रॉनीक वस्तू हाताळताना काळजी घ्यावी. इतरांनी तुमचा गैरफायदा घेऊ नये यासाठी सतर्क राहावे. कार्यक्षेत्रात कामाशी काम ठेवावे.

कन्या

कन्या राशीच्या लोकांची चिंता वाढू शकते. व्यवसाय करत असाल तर सावध राहा. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. चंद्र मनाचा कारक आहे त्यामुळे यादिवशी मन व मस्तिष्क यात समतोल साधण्यात अडचणी येऊ शकतात.

मकर

मकर राशीच्या लोकांचा व्यवसायात भागीदारासोबत मतभेद होऊ शकतात. शांत राहून परिस्थिती समजून घ्यावी लागेल. रागावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा.

अमावस्या दोषावर उपाय

अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवावा. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा, विशेषतः तुमच्या पालकांचा कधीही अनादर करू नका. अमावस्येच्या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करा. तांदूळ, गूळ आणि दूध दान केल्याने विशेष फळ मिळते. अमावस्या दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी कालीका मातेची पूजा करा. सोमवारी भगवान शिवाची आराधना करा आणि ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा १०८ वेळा जप करा. अमावस्येच्या दिवशी फक्त शाकाहारी जेवण करावे, व्यसन टाळावे.

विभाग