आपलं घर हे आपल्यासाठी सर्वस्व असतं. आपल्या सुखदु:खाचा साथीदार आपलं घर असतं. आपल्याला आपलं घर निवारा देत. कधी हे घर आपल्यासाठी संरक्षक म्हणून भूमिका बजावतं तर कधी हे घर आपल्या सुखद आठवणींनी भरून गेलेलं असतं. मात्र घरात एखादी गोष्ट संपली असेल तर शेजारी जाऊन सर्रास ती गोष्ट मागण्याची आपल्याकडे पद्धत आहे.
मात्र काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला विकतच घेऊनच वापरल्या पाहिजेत असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्राच्या मते काही गोष्टी इतरांकडून फुकट न घेता त्या आपण विकत घेऊनच वापरल्या पाहिजेत. कोणत्या आहेत त्या गोष्टी आपण पाहूया.
अनेकदा घरात आपल्याला दही लावायचं असतं. मग अशात आपण शेजाऱ्यांकडून थोडं दही घेऊन येतो. मात्र असं करत असाल तर जरा थांबा कारण असे मानले जाते की शेजाऱ्यांकडून दही आणल्याने घरातील शांतता नष्ट होते. म्हणूनच दही खरेदी केल्यानंतरच वापरावे.
मोहरीचे तेल कधीही फुकटातलं किंवा मागुन आणलेलं वापरू नये. असं केल्यास शनिदेव क्रोधित होतात आणि त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागतात.
लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहे. त्यामुळे लोखंडापासून बनवलेल्या वस्तू इतरांकडून आणून वापरू नयेत. असे केल्याने आर्थिक संकट वाढते, तसेच घरातील शांतताही भंग पावते.
मीठ हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. बर्याच लोकांना अशी सवय असते की स्वयंपाक करताना मीठ संपले तर ते शेजाऱ्यांकडे मिठाची मागणी करतात. मात्र मीठ हे नेहमी खरेदी केल्यानंतर वापरावे असं सांगितलं जातं. फुकटचं मीठ वापरल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात. हे ऋण मृत्यूनंतरही फेडावं लागतं, असं मानलं जातं.
घरोघरी शिवण्यासाठी सुई आपल्याला सर्रास पाहायला मिळते कधी सुई तुटते. मग कधीतरी धावपळ असल्यास शेजाऱ्यांकडून सुई आणून ती वापरली जाते. ज्योतिषशास्त्रनुसार त्या सुईबरोबर तुम्ही त्या व्यक्तीच्या वाट्याचा शनिचा प्रभावही तुम्ही तुमच्या घरात आणत आहात. म्हणूनच सुई नेहमी खरेदी करा आणि वापरा.
इतरांचा रुमाल वापरू नका
मित्राचा किंवा मैत्रिणीचा रुमाल वापरणंही अशुभ मानलं गेलं आहे. असं केल्यास मैत्रीत दुरावा येतो. याशिवाय काळे तीळ,माचिस,दूध याही गोष्टी कायम विकत घेऊनच वापराव्या असं सांगण्यात येतं.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)