मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  अक्षय्य तृतीयेला या ३ राशींच्या लोकांना लागणार बंपर लॉटरी, लक्ष्मीच्या कृपेने पडू शकतो पैशांचा पाऊस

अक्षय्य तृतीयेला या ३ राशींच्या लोकांना लागणार बंपर लॉटरी, लक्ष्मीच्या कृपेने पडू शकतो पैशांचा पाऊस

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 04, 2024 05:41 PM IST

akshaya tritiya 2024 lucky zodiac signs : अक्षय्य तृतीया यंदा काही राशींच्या लोकांसाठी खूपच शुभ असणार आहे. या राशींच्या लोकांवर माता लक्ष्मी भरभरून धनवर्षाव करणार आहे. अशा स्थितीत त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

अक्षय्य तृतीयेला या ३ राशींच्या लोकांना लागणार बंपर लॉटरी, लक्ष्मीच्या कृपेने पडू शकतो पैशांचा पाऊस
अक्षय्य तृतीयेला या ३ राशींच्या लोकांना लागणार बंपर लॉटरी, लक्ष्मीच्या कृपेने पडू शकतो पैशांचा पाऊस (REUTERS)

lucky zodiac signs on akshaya tritiya 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार अक्षय्य तृतीया यंदा १० मे २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की अक्षय्य तृतीयेला शुभ मुहूर्त न पाळता कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते. म्हणून याला परिपूर्ण शुभ मुहूर्त म्हणतात. 

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच, अक्षय्य तृतीया यंदा काही राशींच्या लोकांसाठी खूपच शुभ असणार आहे. या राशींच्या लोकांवर माता लक्ष्मी भरभरून धनवर्षाव करणार आहे. अशा स्थितीत त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा काळ चांगला जाणार आहे. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसू शकतात. याशिवाय तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतील. तुम्ही नोकरी वगैरेसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. कुटुंबातील वातावरणही चांगले राहील.

मिथुन

अक्षय्य तृतीयेला तयार झालेल्या शुभ योगामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतील. माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर राहील. नोकरी इत्यादी क्षेत्रात तुम्हाला बढती मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसेल. आर्थिक स्थितीतही लाभ होईल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठीही अक्षय्य तृतीयेचा काळ चांगला मानला जात आहे. या काळात तुमच्यासाठी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही अक्षय्य तृतीया तुमच्यासाठी उत्तम काळ असणार आहे. कौटुंबिक जीवनात प्रेमसंबंधांमध्ये उत्साह राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी प्रवास करावासा वाटेल.

 

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े

WhatsApp channel