मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषांनी आजच सोडा 'या' सवयी! तुम्हाला करोडपती होण्यापासून कुणीही नाही रोखू शकणार

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषांनी आजच सोडा 'या' सवयी! तुम्हाला करोडपती होण्यापासून कुणीही नाही रोखू शकणार

Jun 29, 2024 01:40 PM IST

Astrology : शास्त्रात मनुष्याच्या वागणुकीचे काही नियम अधोरेखित करण्यात आले आहेत. जर तो पुरुष त्या नियमांचे पालन करत नसेल तर त्याला अशा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषांनी आजच सोडा 'या' सवयी! तुम्हाला करोडपती होण्यापासून कुणीही नाही रोखू शकणार
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषांनी आजच सोडा 'या' सवयी! तुम्हाला करोडपती होण्यापासून कुणीही नाही रोखू शकणार

प्रत्येक व्यक्तीला ऐषारामी आयुष्य जगण्याची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येकजण प्रचंड कष्टसुध्दा घेत असतो. मात्र बहुतांश लोकांना अतोनात कष्ट करुनसुद्धा यश पदरी पडत नाही. घरामध्ये सुखसमृद्धी राहात नाही. खिशात पैसा टिकत नाही. त्यामुळे आर्थिक स्थितीसुद्धा कमकुवत असते. सतत पैशांची चणचण भासते. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्याही आयुष्यात या गोष्टी घडत असतील तर त्यासाठी तुमचा स्वभावदोष जबाबदार असू शकतो. शास्त्रात मनुष्याच्या वागणुकीचे काही नियम अधोरेखित करण्यात आले आहेत. जर तो पुरुष त्या नियमांचे पालन करत नसेल तर त्याला अशा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत ज्योतिष आचार्य संतोष कुमार चौबे यांनी सांगितले की, पुरुषांच्या अंगी काही अशा सवयी असतात ज्या त्यांना कधीही करोडपती होऊ देत नाहीत. या वाईट सवयींमुळे तो व्यक्ती सतत दारिद्रयात राहतो. अशा पुरुषाने कितीही मेहनत घेतली तरी त्याला मनासारखे यश अजिबात मिळत नाही. यश आणि संपत्ती मिळवण्यासाठी केवळ कष्ट करुन चालत नाही. तर त्यासोबतच तुम्हाला तुमचे चारित्र्य, वागणूक आणि दैनंदिन दिनचर्यादेखील सुधारावी लागते. आणि या गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष दिल्यास नक्कीच तुम्हाला श्रीमंती लाभू शकते.

पुरुषांच्या 'या' सवयींमुळे दारिद्रय येते

ज्योतिषीय अभ्यासानुसार, पुरुषांची प्रगती न होण्याची पहिली वाईट सवय म्हणजे घरातील स्त्रियांचा अपमान करणे. हिंदू शास्त्रानुसार स्त्रियांना घरातील लक्ष्मीस्वरुप मानले जाते. म्हणूनच जे पुरुष स्त्रियांचा अपमान करतात, त्यांच्यावर हात उचलतात, उद्धट बोलतात किंवा त्यांच्याशी गैरवर्तन करतात. अशा पुरुषाजवळ लक्ष्मी कधीच वास करत नाही. त्यामुळे त्यांना सतत पैशांची चणचण भासते. आर्थिक नुकसान होते. आणि घरात दारिद्रय येते. या पुरुषांना कधीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभत नाही. आणि त्यामुळेच त्यांना आयुष्यात आर्थिक प्रगतीला हुकावं लागतं.

याशिवाय जे पुरुष सकाळी सूर्योदयानंतर अगदी उशिरा उठतात. ज्या पुरुषांना सकाळी उठल्यानंतर दात घासणे किंवा आंघोळ करायला आवडत नाही. त्यांच्यावर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. शिवाय घरातील वस्तू नीट न ठेवणे. घरात अस्वच्छता ठेवणे तिथेही देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही. अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळेच अशा पुरुषांच्या घरात नेहमीच वादविवाद, भांडण आणि तणावाचे वातावरण असते. अशा पुरुषांवर लक्ष्मी नाराज असल्याने त्यांच्याकडे पैसेसुद्धा टिकत नाहीत. त्यामुळे अशा पुरुषांना करोडपती होण्याची स्वप्ने पाहणे व्यर्थ ठरते. मात्र या गोष्टी तुम्ही टाळल्या आणि आचरणात सुधारणा केल्यास तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते आणि यशाचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतात.

WhatsApp channel
विभाग