वैदिक शास्त्रानुसार भगवान विष्णूला सृष्टीचा पालनकर्ता म्हणून संबोधले जाते. उद्या गुरुवार आहे. आणि गुरुवारचा दिवस भगवान विष्णूला समर्पित करण्यात आला आहे. गुरुवारच्या दिवशी मनोभावाने विष्णू देवाची आराधना केल्याने देव प्रसन्न होतात. आणि भक्तांना याचे लाभदायक परिणाम दिसून येतात. तसेच प्रत्येक महिन्यात भगवान विष्णूसाठी दोन एकादशी व्रत करण्यात येतात. यामध्ये एक शुक्ल पक्षातील तर एक कृष्ण पक्षातील हा व्रत असतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, भगवान विष्णू आपल्या भक्तांचा उद्धार करतात. तसेच त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. परंतु अनेकांना माहिती नसेल की, राशीचक्रातील बारा राशींपैकी चार राशींवर विष्णू देवाची मोठी कृपादृष्टी असते. या राशी नेहमीच फायद्यात असतात. त्यांना कोणत्याही कार्यात फारशा अडचणीचा सामना करावा लागत नाही. त्या चार नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
वृषभ राशीच्या लोकांवर विष्णू देवाची उत्तम कृपादृष्टी असते. त्यामुळेच या लोकांना कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त होते. कार्यक्षेत्रात त्यांच्या कामाचे कौतुक होते. नोकरी-व्यवसायात कमी कालावधीत मोठी प्रगती होते. तसेच या लोकांचे वैवाहिक आयुष्य सुखद असते. घरामध्ये सुख शांती आणि आनंदाचा वास असतो. या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडत असतात. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो.
राशीचक्रातील चौथ्या क्रमांकाची राशी म्हणून कर्क राशीला ओळखले जाते. कर्क राशीच्या लोकांवरसुद्धा भगवान विष्णूची प्रचंड कृपादृष्टी असते. या राशीचे लोक अत्यंत मेहनती आणि हुशार असतात. त्यांना प्रत्येक कामात यश मिळते. शिवाय त्यांना आयुष्यात अनेक चांगल्या संधी मिळतात. बुद्धिमत्तेचे कौतुक होऊन लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. उद्योग-व्यवसायात आर्थिक लाभ होऊन चांगला विस्तार होतो. जोडीदारासोबत यांचे संबंध खूप चांगले असतात. त्यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी पाहायला मिळते.
सिंह राशीच्या लोकांवरसुद्धा भगवान विष्णूची कृपादृष्टी असते. विष्णू देवाच्या कृपेने हे लोक नोकरी-व्यवसायात प्रचंड यश प्राप्त करतात. कमी वेळेत या लोकांना चांगले यश लाभते. त्यामुळे त्यांच्या करिअरचा आलेख वेगाने उंचावतो. सिंह राशीच्या लोकांना आयुष्यात प्रत्येक सुख पदरात पडते. त्यामुळे हे लोक नेहमीच आनंदी आणि उत्साही असतात.
वृषभ, कर्क आणि सिंह राशीप्रमाणेच तूळ राशीवरसुद्धा भगवान विष्णूची अफाट कृपादृष्टी असते. विष्णू देवाच्या कृपेने यांच्या आयुष्यातील दुःख आणि अडचणी दूर होतात. या राशीच्या लोकांनासुद्धा आयुष्यातील प्रत्येक सुख भोगायला मिळते. शिवाय करिअरमध्येसुद्धा चांगला लाभ यांना मिळतो.