वैदिक शास्त्रानुसार, नऊ ग्रहांचा माणसाच्या आयुष्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. शास्त्रानुसार हे नऊ ग्रह ठराविक वेळेनंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थान बदलत राहतात. हे नऊ ग्रह आपापल्या अक्षावर फिरत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला त्या ग्रहाचे संक्रमण किंवा गोचर असे म्हणतात.
ज्योतिष अभ्यासानुसार, प्रत्येक ग्रहाचे संक्रमण वेगवेगळ्या वेळेत होत असते. ज्यामध्ये किमान २.५ दिवस (६० तास) आणि कमाल अडीच वर्षे (३० महिने) इतका कालावधी असतो. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत एकूण नऊ ग्रह आहेत. ज्यामध्ये चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, सूर्य, राहू आणि केतू यांचा समावेश होतो. हे सर्व नऊ ग्रह वेगवेगळ्या वेळी संक्रमण करतात आणि त्यांची राशी बदलतात. ज्याचा ग्रहानुसार माणसाच्या आयुष्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो.
एका रिपोर्टमध्ये ग्रहांच्या संक्रमणाबाबत सांगितले आहे की, नवग्रहांचे संक्रमण वेगवेगळ्या वेळी होते. ज्यामध्ये ग्रहांचे देवता असलेल्या सूर्यदेवाचे संक्रमण दर महिन्याला होते. सूर्य दर महिन्याला राशीपरिवर्तन करतो. सूर्यागमनास २९ ते ३० दिवसांचा कालावधी लागतो. तर दुसरीकडे बुद्धी आणि ज्ञानाचा प्रतीक असणारा बुध ग्रह २१ दिवसात आपली राशी बदलतो. त्यालाच बुध ग्रहाचे संक्रमण म्हटले जाते. तर प्रेम, सुखसमृद्धी, कलेचा प्रतीक असणारा शुक्र २६ दिवसात आपली राशी बदलतो. तर मंगळ राशी परिवर्तनासाठी थोडा जास्त वेळ घेतो. मंगळाचे संक्रमण तब्बल ४५ दिवसांत होते.
ज्योतिषअभ्यासानुसार गुरुसुद्धा राशी परिवर्तन करण्यासाठी अधिक कालावधी घेतो. गुरु ग्रह दर १२ महिन्यांनी म्हणजेच एका वर्षाने आपली राशी बदलतो. तर महत्वाचे म्हणजे राहू आणि केतूचे संक्रमण एकाच वेळी होते. राहू आणि केतू १८ ते १९ महिन्यांत राशी आपली राशी बदलतात.
शनीचे संक्रमण सर्वात जास्त कालावधीचे आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी एक-दोन नव्हे तब्बल अडीच वर्षे लागतात. याउलट चंद्रासाठी सर्वात कमी कालावधी लागतो. चंद्र संक्रमण केवळ अडीच दिवसात होत असते.
राशीभविष्य हा ज्योतिषशास्त्रातील अविभाज्य भाग आहे. ग्रह-नक्षत्रांच्या राशी परिवर्तनावरुन या राशींचे भविष्य ठरत असते. प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह निश्चित असतो. त्या ग्रहाच्या हालचालींचा आणि गुणधर्माचा प्रभाव या राशींवर पडत असतो. ग्रहांनी राशी परिवर्तन करताच बाराही राशींवर सकारात्मक-नकारात्मक प्रभाव दिसून येतात.
संबंधित बातम्या