Astrology : सोने धारण केल्याने 'या' राशींचे चमकते नशीब! मात्र ' या' लोकांनी चुकूनही घालू नये गोल्ड ज्वेलरी
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Astrology : सोने धारण केल्याने 'या' राशींचे चमकते नशीब! मात्र ' या' लोकांनी चुकूनही घालू नये गोल्ड ज्वेलरी

Astrology : सोने धारण केल्याने 'या' राशींचे चमकते नशीब! मात्र ' या' लोकांनी चुकूनही घालू नये गोल्ड ज्वेलरी

Jul 16, 2024 12:41 PM IST

Astrology About Gold : ज्योतिषशास्त्रात सोने धारण करण्याबाबत काही नियम सांगितले आहेत. त्या-त्या राशीनुसार सोने लाभदायक की नुकसानीचे याचा खुलासा करण्यात आला आहे.

कोणत्या राशींसाठी सोने शुभ असते?
कोणत्या राशींसाठी सोने शुभ असते?

सोने धारण करणे प्रत्येकालाच आवडते. स्त्रिया तर सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी नेहमीच तयार असतात. स्त्रियाच नव्हे तर काही पुरुषदेखील सोन्याचे आभूषण धारण करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. दररोजच्या आयुष्यात जवळपास सर्वच लोक सोने धारण करून असतात. परंतु अनेकांना माहिती नसेल की, ज्योतिषशास्त्रात सोने धारण करण्याबाबत काही नियम सांगितले आहेत. त्या-त्या राशीनुसार सोने लाभदायक की नुकसानीचे याचा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळेच आज आपण सोने घालणे कोणत्या राशींसाठी शुभ तर कोणत्या राशींसाठी अशुभ असणार हे जाणून घेणार आहोत.

कोणत्या राशींसाठी सोने शुभ असते?

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी सोने धारण करणे अत्यंत लाभदायक असते. सिंह अग्नी तत्वाची राशी आहे. शिवाय या राशीचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळेच या राशींना सोने फायद्याचे असते. सोने धारण केल्याने तुम्हाला करिअरमध्ये चांगले यश मिळते. सोन्याचे शुभ प्रभावाने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते. आर्थिक स्थिती सुधारते. घरात असलेली आर्थिक चणचण दूर होते.

तूळ

सोन्याचे दागिने धारण करणे तूळ राशीच्या लोकांसाठी फलदायी असते. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी सोने धारण केल्यास आर्थिक लाभ मिळायला सुरुवात होते. शिवाय आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होतात. रखडलेली कामे मार्गी लागतात. कार्यक्षेत्रात विशेष प्रगती होते. करिअरचा आलेख वेगाने उंचावतो. शिवाय मानसिक समाधान लाभते.

कन्या

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांना सोने घालणे अत्यंत शुभ असते. सोने घालण्याने तुमच्या आयुष्यात विविध मार्गाने सुखसमृद्धी येते. शिवाय सोन्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या करिअरवर पडतो. सोने धारण केल्याने तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या विविध संधी उपलब्ध होतात. धन कमविण्याचे मार्ग सापडतात. उत्पन्नात वाढ झाल्याने आर्थिक स्थिती सुधारते. शिवाय समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. त्यामुळे या राशीच्या लोकांनी सोने अवश्य धारण करावे.

मकर

ज्योतिष अभ्यासानुसार मकर राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने घालणे अत्यंत चांगले समजले जाते. सोने धारण केल्याने तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळते. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे साहजिकच सुखसमृद्धी नांदू लागते. आर्थिक स्थिती सुधारते. प्रत्येक कार्यात यश मिळते. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होते. शिवाय तुमचे व्यक्तिमत्व अधिक खुलून येते.

मीन

वैदिक शास्त्रानुसार मीन राशींच्या लोकांसाठीसुद्धा सोने धारण करणे फलदायी ठरते. शास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने धारण केल्यास त्यांच्या आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होतात. तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. प्रत्येक क्षेत्रात यश मिळायला सुरुवात होते. आयुष्यात आर्थिक स्थिरता निर्माण होते. त्यामुळे या राशीच्या लोकांनी आवर्जून सोने धारण करावे.

कोणत्या राशींसाठी सोने अशुभ?

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, वृषभ, वृश्चिक, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांनी सोने धारण करणे नुकसानीचे ठरू शकते. या लोकांनां सोन्याच्या अशुभ प्रभावाने आर्थिक अडचणी येऊ शकतात. शिवाय करिअरमध्ये विविध अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे या लोकांनी शक्यतो सोने ज्योतिषीय सल्ल्यानेच धारण करणे सोयीचे असते.

Whats_app_banner