मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Astrology : 'या' ४ राशींच्या मुलांच्या पटकन प्रेमात पडतात मुली! तुम्ही तर नाही ते नशीबवान?

Astrology : 'या' ४ राशींच्या मुलांच्या पटकन प्रेमात पडतात मुली! तुम्ही तर नाही ते नशीबवान?

Jul 03, 2024 01:25 PM IST

Astrology Prediction : ज्योतिषअभ्यासात राशींवरून फक्त भविष्य समजत नाही. तर राशींच्या आधारे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, आवडी-निवडी आणि गुणदोषसुद्धा समजतात.

प्रेमाच्या बाबतीत नशीबवान राशी
प्रेमाच्या बाबतीत नशीबवान राशी

वैदिक शास्त्रानुसार राशीचक्राचे आपल्या आयुष्यात प्रचंड महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार राशीचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. त्यामुळेच अनेक लोकांना राशीभविष्य पाहून दिवसाची सुरुवात करायची सवय असते. राशीभविष्यनुसार हे लोक आपल्या दिवसाचे नियोजन करत असतात. राशींवरून फक्त भविष्य समजत नाही. तर राशींच्या आधारे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, आवडी-निवडी आणि गुणदोषसुद्धा समजतात. राशींच्या स्वामी ग्रहांचा प्रभाव त्या राशींच्या लोकांवर पडत असतो. त्यामुळेच प्रत्येक राशीच्या लोकांमध्ये काही खास गुणधर्म असतात. आज आम्ही तुम्हाला अशा ४ राशींबद्दल सांगणार आहोत ज्या राशींच्या मुलांच्या प्रेमात मुली अक्षरशः वेड्या होतात. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घेऊया.

मिथुन

राशीचक्रातील बारा राशींपैकी एक राशी म्हणजे मिथुन होय. मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रह बुद्धी, व्यापार, धन यांचा कारक मानला जातो. मिथुन राशीच्या मुलांकडे मुली पटकन आकर्षित होतात. हे लोक लक्ष आकर्षित करण्यात पटाईत असतात. शिवाय मुली पाहताचक्षणी या मुलांच्या प्रेमात पडतात. या राशीची मुले अतिशय रुबाबदार आणि आकर्षक असतात.

तूळ

तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असतो. शुक्र हा ग्रह धन, संपत्ती, सौंदर्य, ज्ञान, विलासिनता यांचा कारक ग्रह मानला जातो. या राशीचे मुले दिसायला देखणी आणि आकर्षक असतात. या मुलांकडे उत्तम संवाद कौशल्य असते. त्यामुळे या राशीच्या मुलांकडे मुली पटकन आकर्षित होतात. ही मुले आपल्या प्रभावी बोलण्यातूनच मुलींना घायाळ करतात. शिवाय हे लोक अत्यंत शिस्तप्रिय आणि कष्टाळू असतात. काम आणि प्रेम यामध्ये समतोल साधने यांना अचूक जमते. त्यामुळेच मुली या राशीच्या मुलांच्या प्रेमात पडतात.

सिंह

सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य असतो. सूर्याला ग्रहांचा राजा म्हणून संबोधले जाते. सूर्य ग्रह तेजस्वीपणा, नेतृत्वगुण, धडाडीपणा यांचा कारक ग्रह आहे. या सर्व गुणधर्मांचा प्रभाव त्या राशीच्या लोकांवरसुद्धा पडतो. या राशीची मुले धाडसी आणि स्पष्टवक्ते असतात. त्यांचा हाच गुण मुलींना प्रचंड वाढतो. शिवाय ही मुले प्रत्येक परिस्थितीत मुलींना साथ देतात. या मुलांमध्ये तेजस्वीपणा आणि नेतृत्वगुण असतात ज्यामुळे ते समाजात उठून दिसतात. आणि म्हणूनच मुली यांच्या प्रेमात पडतात.

मकर

मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. शनी सत्य, न्यायप्रिय, ज्ञान, बुद्धी, एकनिष्ठ, कर्म यांचा कारक मानला जातो. या राशीच्या लोकांवर शनिदेवाचा प्रभाव असतो. या राशीचे मुले अत्यंत दयाळू स्वभावाचे असतात. त्यांच्यातील न्यायप्रिय गुण मुलींना प्रचंड भावतो. इतरांना मदत करण्यात हे लोक नेहमीच पुढाकार घेतात. या गुणधर्मामुळेच मुली त्यांच्या प्रेमात पडतात. शिवाय हे लोक दिसायला अत्यंत देखणे असतात. अनेक मुली त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे त्यांच्याकडे पटकन आकर्षित होतात. या राशीच्या मुलांना मुलींना खुश करणे सहज शक्य होते. ही मुले मुलींना भेटवस्तू देण्यात, सरप्राईज देण्यात पटाईत असतात.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel