पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आप'ची दुसरी यादी जाहीर, पु्ण्यातील दोन उमेदवारांचाही समावेश

आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने रविवारी आपली दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली. पुण्यातील दोन मतदार संघातील उमेदवारांसह एकूण आठ उमेदवारांचा या यादीत समावेश आहे.

No photo description available.

पुण्यातील शिवाजी नगर मतदार संघातून मुकुंद किर्दत तर वडगावशेरी मतदार संघातून गणेश धमाले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील मध्य सोलापूर मतदार संघातून अ‍ॅड. खतीब वकील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील जालना मदतदार संघातून कैलास फुलारी, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मतदार संघातून डॉ सुनील गावित आणि कोंकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-वळवा मतदार संघातून डॉ. अल्लामाश फैजी निवडणूक लढणार आहेत. 

एकाही काश्मिरी जनतेवर गोळी चालणार नाही, पण..: अमित शहा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:aam aadmi party declares 8 candidate in second list of maharashtra assembly elections 2019