पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Vidhan Sabha results 2019: आज मतमोजणी! कोण ठरणार भारी?

विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राज्यातील विधानसभेच्या २८८ जागेसह सातारा लोकसभेच्या पोट निवडणुकीच्या मतमोजणीला आज (गुरुवारी) सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आणुया आपलं सरकार या नाऱ्यासह भाजप आणि शिवसेना इतर मित्रपक्षाच्या साथीने महायुतीच्या माध्यमातून सत्ता कायम राखण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी इतर मित्रपक्षाच्या साथीने परिवर्तन  करण्याच्या इराद्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Maharashtra Exit Polls: पुन्हा महायुतीकडेच सत्तेचा अंदाज

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी तर कणखर विरोधी पक्ष म्हणून संधी द्या असे म्हणत राज ठाकरेंनी जनतेला साद घातली आहे. मतदार राजाने कुणाला पसंती दिली याच चित्र दुपारपासून स्पष्ट होण्यास सुरुवात होईल. रात्रीपर्यंत राज्यात कुणाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित होईल.   

राज्यातील २६९ ठिकाणी असलेल्या २८८ केंद्रावर मतमोजणी केली जाणार आहे. प्रत्येक मतदार संघात केंद्राच्या संख्येनुसार १४ ते २० टेबल ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीवेळी उमेदवाराच्या प्रतिनिधीला उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरिक्षकही याठिकाणी उपस्थित असतील. एखाद्या उमेदावाराने फेरमतमोजणीची मागणी केल्यास याचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे निवडणूक अधिकाऱ्याकडे असतील, असे राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले आहे.

अ‍ॅपवर पाहता येणार निकाल 

निवडणूक आयोगाच्या result.eci.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना निकाल पाहता येणार आहेत. तसेच voter helpline हे अ‍ॅप गुगल प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करूनही मतदारसंघाचे फेरनिहाय निकाल, उमेदवारांची पक्षनिहाय आघाडी, विजयी-पराभूत उमेदवार आणि पक्षनिहाय मतांची टक्केवारीही माहिती उपलब्ध असणार आहे. 

मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त

मतमोजणी केंद्राबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्तात असलेल्या स्ट्राँग रुममधून मतपेट्या बाहेर काढण्यापासून ते त्या मतमोजणी केंद्रावर नेण्यापर्यंतचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.   

गेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा?

मतदानानंतर बहुतांश सर्वच एक्झिट पोलनी वर्तवलेले अंदाज हे काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देणारे आहे. रिपब्लिक जन की बातनुसार आघाडीला ५२-५९ तर इंडिया टुडे-एक्सिसनुसार ७२-९० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. न्यूज १८-आयपीएसओएसनुसार आघाडी फक्त ४१ ठिकाणी विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. एबीपी-सी व्होटरनुसार ५५-८१ जागा तर टाइम्स नाऊनुसार ४८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही आकडेवारी सत्ताधारी पुन्हा सत्तेत विराजमान होण्याचे संकेत देणारी आहे. मात्र विरोधक परिवर्तनावर ठाम असून राज्यात सत्तांतर होणार, असा विश्वास वर्तवण्यात आला आहे. 

साताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार

२०१४ मधील विभागनिहाय जिंकलेल्या जागा

उत्तर महाराष्ट्र  

एकूण जागा - ३७

भाजप - १६

शिवसेना - ७

राष्ट्रवादी - ५

काँग्रेस - ७

इतर - २

विदर्भ  

एकूण जागा - ६१

भाजप - ४३

शिवसेना - ४

काँग्रेस - १०

राष्ट्रवादी - १

इतर - ३

मराठवाडा  

एकूण जागा - ४६

भाजप - १५

शिवसेना - ११

काँग्रेस - ९

राष्ट्रवादी - ८

इतर - ३

कोकण  

एकूण जागा - १३

भाजप - ०

शिवसेना - ७

काँग्रेस - १

राष्ट्रवादी - ३

इतर - २

पश्चिम महाराष्ट्र  

एकूण जागा - ७०

भाजप - २४

शिवसेना - १३

काँग्रेस - १०

राष्ट्रवादी - १९

मनसे - १

इतर - ३

मुंबई आणि ठाणे  

एकूण जागा - ६१

भाजप - २४

शिवसेना - २१

काँग्रेस - ५

राष्ट्रवादी - ५

इतर – ६

 


 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:vidhan Sabha election results 2019 detail information of counting for assembly election result