पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरेंनी मामलेदार मिसळचा घेतला आस्वाद

राज ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचारसभा घेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या देखील ठिकठिकाणी सभा सुरु आहेत. प्रचार सभेवरुन मुंबईकडे परतत असताना राज ठाकरे यांनी ठाण्यातील प्रसिध्द मामलेदार मिसळ हॉटेलला भेट दिली. याठिकाणी राज ठाकरे यांनी मिसळ खाण्याचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

'भारतीय अर्थव्यवस्था एका व्यक्तीच्या मर्जीवर चालू शकत नाही'

भिवंडी, कल्याण येथे शनिवारी राज ठाकरे यांच्या प्रचार सभा झाल्या. या सभांवरुन मुंबईकडे येत असताना राज ठाकरे यांना भूक लागल्याने त्यांनी एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये न जाता आपला मोर्चा थेट ठाण्यातील मामलेदार मिसळ हॉटेलकडे वळवला. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मनसेचे पदाधिकारी होते. राज ठाकरे मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी आल्याचे कळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी देखील त्याठिकाणी त्यांची भेट घेतली. 

मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉकद्वारे मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

तसंच आपापल्या मतदार क्षेत्रात प्रचार करणाऱ्या मनसेच्या सर्व उमेदवारांनी देखील राज ठाकरे यांना भेटण्यासाठी मामलेदार मिसळ हॉटेलला भेट दिली. मामलेदार मिसळ राज ठाकरे यांना खूप आवडते असे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांनी मामलेदार मिसळ खाल्ल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. 

मुंबईतील चर्नीरोड येथे इमारतीला भीषण आग